Home Minister Arag Jnanendra Nitin Gadkari
Home Minister Arag Jnanendra Nitin Gadkari esakal
देश

Hindalga Jail : नितीन गडकरींना तुरुंगातून धमकीचा फोन; गृहमंत्री म्हणाले, कॉल्सवर आता बारकाईनं..

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरु : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नुकतंच फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीनं गडकरींकडं तब्बल 100 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. त्यात गडकरींना कर्नाटकच्या बेळगावातील हिंडलगा तुरुंगातून (Belgaum Hindalga Jail) धमकावण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लागलीच कर्नाटक पोलिसांनी हिंडलगा तुरुंगाच्या दिशेनं धाव घेतली. त्यांनी गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याची चौकशी केली.

या कैद्यानं आपली ओळख कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Don Dawood Ibrahim) हस्तक म्हणून करवून दिली. आपलं नाव जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी असं सांगितलं. या प्रकरणी आता गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र (Araga Jnanendra) यांनी कर्नाटक पोलिसांना (Karnataka Police) चौकशीचे आदेश दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, 'मंत्री गडकरींना धमकीचा फोन करणाऱ्याची चौकशी सुरु असून आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल. कारागृह आणि पोलीस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.'

येत्या तीन महिन्यांत राज्यभरातील सर्व तुरुंगांमध्ये 5G सेवा सुरु करणार असून कारागृहात जॅमर बसवले जाणार आहेत. तुरुंगातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या कॉल्सवर आता बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल आणि तुरुंग परिसरात वेळोवेळी तपासणी केली जाईल, असं गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितलं.

गडकरींना धमकी देण्याचं काय आहे प्रकरण

पोलिसांच्या माहितीनुसार, गडकरींच्या नागपूर स्थित जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी 11.25 वाजेपासून साडे 12 वाजेपर्यंत धमकीचे 3 फोन आले. या धमकीनंतर नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानासह कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

फोनवरून धमकी देणाऱ्याने पैसे पोहोचवण्यासाठी स्वतःचा फोन क्रमांक व कर्नाटकचा पत्ता दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT