Husband harrassed by Wife
Husband harrassed by Wife Sakal
देश

'मला माझ्या बायकोपासून वाचवा' म्हणत पतीने गाठलं पोलीस स्टेशन!

सकाळ डिजिटल टीम

'मला माझ्या बायकोपासून वाचवा'... मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमध्ये (Police station) जाऊन हा व्यक्ती थेट डीएसपींना (DSP) जाऊन भेटला. पत्नीच्या छळाला कंटाळून भिंड जिल्ह्यातील भरौली तालुक्यामधील रहिवासी मनोज कुमार याने ही कैफियत मांडली आहे.

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) पतीची ही कैफियत लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. स्वत:ला पीडित असल्याचे सांगून मनोजने पत्नी सोनम त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप करत आहे. त्याची पत्नी त्याला वेळेवर जेवणही देत ​​नाही, असा आरोप मनोजने केला. (Husband reached police station saying 'save me from my wife'!)

मनोजने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीने इतर कामातही त्याचा छळ केला. एवढेच नाही हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी त्याला गोवण्याची धमकीही दिली आहे. मनोज म्हणतो की, त्याने आपल्या पत्नीबद्दल तिच्या पालकांकडे अनेकदा तक्रार केली आहे पण कोणीही त्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. मनोजच्या म्हणण्यानुसार, बरौली पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी त्याचे ऐकले नाही.

आता त्रासलेला पती आपली तक्रार घेऊन महिला डीएसपी पूनम थापा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. मनोजने डीएसपींना सांगितले की, त्याची पत्नी त्याचा छळ करत असते. त्यामुळे त्याला पत्नीपासून वाचवले पाहिजे. या प्रकरणी आता महिला डीएसपीने मनोजच्या पत्नीशी बोलून या आरोपांचीही चौकशी करण्यास सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT