IAS 
देश

IAS Officer Retired: कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडिअम रिकामं केलं! सरकारनं महिला IAS अधिकाऱ्याला कायमच बसवलं घरी

आयएएस अधिकारी असलेल्या दाम्पत्यावर झाली कडक कारवाई

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : आपल्या पाळीव कुत्र्याला सकाळी फेरफटका मारण्यासाठी खेळाच्या स्टेडियममध्ये घेऊन जाणाऱ्या आणि त्यासाठी संपूर्ण स्टेडियमच रिकाम करण्याचे आदेश देणाऱ्या महिला आयएएस अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. अरुणाचल प्रदेशच्या सरकारनं त्यांना सक्तीनं घरी बसवलं आहे, अर्थात निवृत्त केलं आहे. (IAS officer compulsorily retired who emptied Delhi stadium to walk her dog)

मुख्य सचिवपदी नियुक्ती

रिंकू दुग्गा असं या महिला आयएएस अधिकाऱ्याचं नाव असून त्या १९९४ च्या AGMUT (अरुणाचल प्रदेश-गोवा-मोझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) या केडरच्या अधिकारी आहेत. सध्या या महिला अधिकाऱ्याची अरुणाचल प्रदेशात स्वदेशी व्यवहार मंत्रालयात मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होती. (Latest Marathi News)

सक्तीनं केलं निवृत्त

दरम्यान, केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, 1972 च्या मूलभूत नियम (FR) 56(j), नियम 48 अंतर्गत दुग्गा यांना त्यांच्या सेवा रेकॉर्डचं मूल्यांकन केल्यानंतर सक्तीनं सेवानिवृत्त करण्यात आलं आहे. सरकारला कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याला सक्तीनं निवृत्त करण्याचा अधिकार आहे. जर निवृत्तीचं कारण हे सार्वजनिक हिताचं असेल तर, असं सुत्रांनी माहिती देताना म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

दाम्पत्याची झाली होती बदली

रिंकू दुग्गा आणि त्यांचे पती संजीव खिरवार हे देघेही १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दोघेही वर्षभरापूर्वी दिल्लीत नियुक्तीवर होते. पण त्यांनी एकदा आपल्या पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी खेळाचं स्टेडियम रिकामं केल्याचा प्रकार घडला होता.

याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यानंतर गेल्या वर्षी या दोन्ही दाम्पत्याची दिल्लीबाहेर बदली करण्यात आली होती. यामध्ये दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये तर खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT