Corona-Tablighi 
देश

Coronavirus : तबलिगींमुळे आठवडाभरात वाढू शकतात १ लाख कोरोना रुग्ण!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना कधी एकदा घराबाहेर पडतोय असे झाले आहे. त्यामुळे १७ मे रोजी केंद्र सरकार लॉकडाऊन शिथिल करणार का? याकडेच सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

मात्र, तबलिगींमुळे येत्या एक आठवड्याच्या कालावधीत देशात कोरोनाचे १ लाख रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे रोहतक येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्या अडचणींत आणखी भर पडणार असल्याचे या रिपोर्टमुळे दिसून येते. 

राजधानी दिल्ली येथे १३ ते १५ मार्च रोजी तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमास जमलेले नागरिक देशभरात सर्वत्र विखुरले गेले. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होऊ लागल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. या कार्यक्रमाला एक महिना उलटून गेल्यावर म्हणजे १५ एप्रिलला देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजाराच्या घरात होती. आणि १५ मेनंतर यामध्ये भर पडत ती दीड लाखाच्याही पुढे जाईल, असा अंदाज आयआयएमने व्यक्त केला आहे. 

तबलिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ होईल. दिल्ली आणि मुंबई येथे सर्वात जास्त प्रकरणे समोर येतील, असेही या अहवालात म्हटले आहे. आयआयएमचे संचालक धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमोल सिंग, डॉ. अभय पंत आणि त्यांच्या टीमने याबाबतचा अभ्यास केला आहे. 

शर्मा म्हणाले की, १४ एप्रिलला लॉकडाऊन हटविला जाईल, असे सर्वांना वाटत होते. या दृष्टीने आम्ही देशातील कोरोना परिस्थितीचा अभ्यास करण्यास सुरवात केली होती. कोरोनाला रोखायचं असेल तर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी लागेल, असेही मत या अहवालात नोंदविले आहे.

शर्मा आणि त्यांच्या टीमने www.covid19india.org या संकेतस्थळावरील सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेत काही गणितीय समीकरणांद्वारे विश्लेषण करत सदर अहवाल तयार केला आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर पहिल्या महिन्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास तीन पटीने वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

अहवालात जाहीर केलेले आकडे आणि देशात समोर आलेल्या कोरोना केसेस यामध्ये जवळपास ९३ टक्के अचूकता असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६७ हजारांहून अधिक आहे. आणि येत्या आठवडाभरात हाच आकडा दीड लाखाच्याही पुढे जाऊ शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आठवडाभरात सुमारे एक लाख रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. हे जर रोखायचं असेल, तर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेच लागतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT