देश

Indian Air Strike : भारतानं हल्ला केला अन् सगळंच बदललं.. नेमकं काय घडत गेलं?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारत पाक सीमारेषेवर घडामोडींना वेग आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिला काल (ता.26) दिला. त्यानंतर, इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली.

भारताला योग्य वेळी पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ : इम्रान खान

त्यांनंतर, काल (ता.26) भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार यावर प्रतिक्रिया दिल्या गेल्या. पाकिस्तानी सेनेच्या मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन(ISPR) कडून मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये हल्ल्यात कोणीही दगावलं नसल्याचं पाकिस्तानने सांगण्यात आले आणि मारले असेल तर त्याचे काहितरी पुरावे मिळायला हवेत. तसेच, भारतीय मिडियाकडून विनाकारण कांगावा चालू असल्याचा आरोप करण्यात आला.

'300 लोकांना मारलं तर कुठंय त्यांचं रक्त?' (व्हिडिओ)

भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याचा तीळपापड झाला आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Indian Air Strike: पाकिस्तानचा पलटवार; काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

हल्ल्यानंतर नव्या भारताचे नवं चित्र पाहायला मिळत असल्याची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रीया दिली. त्याचबरोबर माझ्यासमोर सध्या न्यू इंडिया उपस्थित असल्याचेही त्यांनी म्हटले.

नव्या भारताचे नवं चित्र पाहायला मिळत आहे : मोदी

आज (ता.27) बिथरलेल्या पाकिस्तानने सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त मिळाले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकले. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघऩ केले होते.

भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब

भारताच्या हद्दीत आलेली पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हवाई दल सतर्क होताच पळून गेली. भारतीय हवाईदलाने त्यांच्या विमानाचा पाठलाग केला.

Indian Air Strike : भारतीय हवाई दलाला पाहून पाकिस्तानी विमाने पळाली

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा खरा असल्याचे सांगितले.

Indian Air Strike : बिथरलेल्या पाकिस्तानचा दुजोरा; भारतात घुसविली विमाने

पाकिस्तानच्या लढाऊ विमानाचा पाठलाग करत असाताना भारतीय हवाई दलाचे मिग 21 हे लढाऊ विमान बडगाम जिल्ह्यातील कलान गावात पाकिस्तानच्या हल्ल्यात कोसळले. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यु झाला तर दुसरीकडे पाकिस्तानने दोन भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला आणि एका वैमानिकाला अटक केल्याचेही पाकिस्तानने सांगितले. 

भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा पाकचा दावा

पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यांनी काही बॉम्ब टाकल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलाविली.

Indian Air Strike : पाकिस्तानचा हल्ला; आता भारत काय करणार? 

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मू, श्रीनगर, अमृतसर, पठाणकोट, चंदिगड ही विमानतळे बंद करण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या निवासस्थानी एक तातडीची बैठक घेण्यात आली. तिन्ही दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल या बैठकीला उपस्थित होते. तसेच काही मंत्रीही या बैठकीला हजर होते.

Indian Air Strike : मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक; आता काय?

पकडेल्या वैमानिक अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 'माझे नाव विंग कमांडर अभिनंदन. माझा सर्व्हिस क्रमांक 27981. मी हवाई दलाचा वैमानिक असून, माझा धर्म हिंदू आहे,' असे या व्हिडिओमधून दाखवले जात आहे. शिवाय, त्यांच्याकडून माहिती वदवून घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Indian Air Strike : पकडलेल्या भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ पाककडून प्रसिद्ध

पाकिस्तानने वैमानिकाला अटक केल्याच्या दाव्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केल्याची माहिती व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर वर्धमान यांच्याविषयीच्या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले. 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान कोण आहेत?

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली.

इम्रान खान यांनी बोलावली अणुविषयक समितीची बैठक

विंग कमांडर अभिनंदन यांना सुखरुप मायदेशी आणा अशी मागणी भारतीयाकडून करण्यात आली. भारतीय जनता अभिनंदन वर्धमान यांना भारतीय सरकार आणि भारतीय आर्मीने मायदेशी सुखरुप आणावे, अशा आशयाच्या भावनिक पोस्ट भारतीय सोशल मिडीयावर करत आहेत.

Bring Back Abhinandan : 'विंग कमांडर अभिनंदन यांना सुखरुप मायदेशी आणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT