पाकिस्तानमधून भारतीय जवानांवर हल्ला करण्याच्या हेतूने येणाऱ्या एक अतिरेकी स्वत:च जखमी झाला. आणि या जखमी दहशतवाद्याला भारतीय दलांच्या जवानांनी आपले रक्त देत त्याचे प्राण वाचवले.
पाकिस्तानचा हा अतिरेकी 21 ऑगस्ट रोजी जम्मू-कश्मीरच्या राजौरी येथे पकडला गेला. तबारक हुसैन असे या दहशतवाद्याचे नाव असून पाकिस्तानी इंटेलिजेंस एंजेसीच्या कर्नलनी इंडियन आर्मीवर हल्ला करण्यासाठी त्याला 30 हजार दिल्याचे चौकशीत समोर आले. (indian soldiers saved life by giving blood to Pakistani terrorist who wantd to attack on indian army)
32 वर्षाचा तबारक हुसैन हा पीओकेच्या सब्जकोट येथे राहतो. नौशेराच्या झांगरमध्ये भारतीय जवानांना बॉर्डरच्या जवळ दोन ते तीन दहशतवादी सीमा पार करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. एक दहशतवादी भारतीय चौकीच्या जवळ बॉर्डर पार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जवानांना पाहून तो घाबरला आणि पळण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा जवानांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला.
भारतीय सेनेचे 80 इन्फैंट्री ब्रिगेड कमांडर, ब्रिगेडियर कपिल राणा यांनी सांगितले की 21 ऑगस्टला सकाळी सैनिकांना बॉर्डरच्या जवळ दोन ते तीन दहशतवादी दिसले. त्यानंतर त्यांनी लगेच हल्ला चढवला. त्यातील दोन दहशतवादी पळाले तर एका जखमी पाकिस्तानी दहशतवादीला जीवंत पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. यात भारतीय जवानांनी त्याला स्वत:चे रक्त दिले आणि त्याचे प्राण वाचवले.
अतिरेकी हुसैन याच्या मते तो खुप काळापासून दहशतवादी संघटनेपासून जुळून आहे. त्याला पाकिस्तानी सेनेचे मेजर रजाक यांच्यापासून ट्रेनिंग मिळते, असाही दावा त्याने केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.