kirit somaiya
kirit somaiya 
देश

मला जोड्याने मारा...किरीट सोमय्यांनी ऐन पत्रकार परिषदेत काढली चप्पल!

ओमकार वाबळे

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील १९ बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते. यासंबंधी त्यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या. (Kirit Somaiya alleges Rashmi Thackeray)

दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले दाखवण्याचं आव्हान केलं होतं. आणि ते न सापडल्यास जोड्याने मारणार असल्याची भाषा केली. यावर किरीट सोमय्यांनी थेट पायातील चप्पल काढून दाखवली. आणि मी केलेले दावे खोटे ठरवल्यास माझ्याच चप्पलीने मारा,असं ते म्हणाले.(Kirit Somaiya on Sanjay Raut)

बोलता बोलता सोमय्यांनी काढली चप्पल!

माझ्या विरोधात तक्रार करायची असेल तर करा. रश्मी ठाकरे यांनी सदर ग्रामपंचायतीला माफीनाम्याचं पत्रंही लिहिलं आहे. जोड्याने किरीट सोमय्यांना मारणार असााल तर मारा, माझ्याच जोड्याने मारा. मी तयार आहे! असं ते म्हणाले. मी माझी चप्पल संजय राऊत यांच्या हातात द्यायला तयार आहे. फक्त राऊत यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडून मी सादर केलेले पुरावे खोटे असल्याचं सांगावं. तसं झाल्यास मी जोड्याने मार खाई, असं सोमय्या म्हणाले.

'कशाला खोली सॅनिटाईज करता, मी येतो तुरुंगात!'

संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर ट्वीट केलं. यामध्ये बाप-बेट्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं ते म्हणाले. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचं ते म्हणाले. मला जेलमध्ये टाकणार असाल तर, मी स्वत: येतो, असं ते म्हणाले. कशाला खोली सॅनिटाईज करता, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. एका दमडीचा घोटाळा काढून दाखवा, असं चॅलेंज त्यांनी केलंय. माझ्यावर १३ केसेस आहेत. १४ वी पाईपलाईनमध्ये आहे. आ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT