love story 60 years grandmother and 22 year old boy at agra 
देश

आजी म्हणाली युवकाला; तू तर माझा प्रियकर...

वृत्तसंस्था

आग्रा (उत्तर प्रदेश): एका 60 वर्षांच्या आजीला सात मुले असून, नातवंडे व पतवंडे आहेत. आजी एका 22 वर्षांच्या युवकाच्या प्रेमात पडल्या असून, युवक तर माझा प्रियकर आहे, असे आजीने पोलिसांसमोर सांगितले.

शहरातील प्रकाशनगर मध्ये ही प्रेम कहाणी फुलली आहे. युवकाच्या पत्नीला दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. आजीने पोलिसांना सांगितले की, प्रेम करणे गुन्हा आहे का? हा तर माझा प्रियकर आहे. आजीच्या वक्तव्याने पोलिसही आचंबित झाले.

युवकाच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'माझा पती व 60 वर्षाच्या आजीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आहेत. प्रेमसंबंध निर्माण झाल्यापासून पती माझ्या सोबत राहात नाही. महिलेचा विषय काढल्यानंतर नवरा मला मारहाण करतो. महिलेमुळे माझे कुटुंब उद्धस्त झाले आहे.'

पोलिसांनी युवकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आजी सुद्धा चौकीत आली. प्रेम करणे गुन्हा आहे का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला जामीन द्यायला मी आली आहे, आजीची ही वक्तव्ये ऐकल्यानंतर पोलिसांनाही काय बोलावे हे समजेनासे झाले. पोलिसांनी अखरे युवकाला समज देऊन परत पाठवले. पण, युवकाच्या पत्नीने पुन्हा तक्रार दाखल केल्यास युवकाला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT