Prabhkaran 
देश

LTTE Prabhakarn: प्रभाकरन लवकरच जाहीर करणार तामिळींच्या मुक्तीची योजना; काँग्रेसच्या माजी नेत्याचा दावा

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येचा कट रचलेल्या एलटीटीचा प्रमुख प्रभाकरन जीवंत असल्याचा दावा नुकताच करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन अद्याप जीवंत असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी नेते पझहा नेदुमारन यांनी केला आहे. त्याचबरोबर प्रभाकरन लवकरच तामिळींच्या मुक्तीची योजना जाहीर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (LTTE chief Prabhakaran alive in touch with his family Ex Congress leader Pazha Nedumaran big claim)

तामिळनाडूतील तंजावूर इथं पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे माजी नेते आणि वर्ल्ड कॉन्फिडरेशन ऑफ तिमिळ या संघटनेचे प्रमुख नेदुमारन म्हणाले, प्रभाकरन लवकरच इलम तमिळींच्या चांगल्या जीवनासाठी, मुक्तीसाठी लवकरच योजना जाहीर करेन. एलटीटीईचा प्रमुख असलेला प्रभाकरन जीवंत असून सध्या तो त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहत आहे. लवकरच तो लोकांसमोरही येईल.

दरम्यान, श्रीलंकेच्या सरकारनं मे २००९मध्ये प्रभाकरनला ठार केल्याचा दावा केला होता. तसेच श्रीलंकेच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की, प्रभाकरन यांच्या डीएनएची चाचणी करण्यात आली असून ती त्याच्या मुलाच्या डीएनएशी जुळून आली आहेत. या दाव्यामुळं प्रभाकरनचा खात्मा झाल्याचं सांगण्यात येत होतं. बातम्यांमध्ये देखील प्रभारकरन याच्या मृतदेहावरील जन्मखून आणि इतर डागांद्वारे त्याची ओळख पटवण्यात यश आलं आहे.

एलटीटीई या दहशतवादी संघटनेचा सन १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात हात होता. तसेच सन २०११ मधील एका मुलाखतीत कुमारन पथमानाथन या एलटीटीईच्या खजिनदारानं भारताची माफी मागत राजीव गांधी यांची हत्या करणं ही प्रभाकरन याची चूक होती असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT