manager accused selling girlfriends photo online sites arrested 
देश

मॅनेजरने प्रेयसीची छायाचित्रे विकली ऑनलाईन...

वृत्तसंस्था

नोएडा : एका कंपनीमध्ये मोठ्या पगारावर काम करत असलेल्या व्यवस्थापकाने प्रेयसीची अश्लिल छायाचित्रे व व्हिडिओ पॉर्न साईटवर विकून पैसे कमावल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रेयसीने तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असून, त्याला एक लाखापेक्षा जास्त पगार आहे. एका महिलेची आणि त्याची रेल्वेत प्रवासादरम्यान ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे मोबाईलवर बोलू लागल्यानंतर त्याने प्रेयसीकडून अश्लिल छायाचित्रे व व्हिडिओ मागून घेतली होती. त्याने मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली होती. पुढे दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर दोघे वेगवेगळे झाले. पण, व्यवस्थापकाने बदला घ्यायचा म्हणून प्रेयसीची छायाचित्रे व व्हिडिओ पॉर्न साईवर विकून पैसे मिळवणे सुरू केले. याबाबतची माहिती प्रेयसीला समजल्यानंतर तिने गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान व्यवस्थापकाचे नाव पुढे आले. कोलकता येथून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिस अधिकारी वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, 'महिलेने 3 मे रोजी फेज-3 पोलस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल साइट्सवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी तपास सुरू केल्यानंतर तिघांची नावे पुढे आली होती. यापैकी एका तरुणाचे या संबंधित महिलेशी काही वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते. तपास सुरू केल्यानंतर आरोपी लखनौसह इतर शहरांमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. त्याची बदली कोलकता येथे झाल्याचे समजल्यानंतर त्याला तेथून अटक करण्यात आली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलींसाठी फायद्याची बातमी! लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळणार १ लाख एक हजार रुपये; सोलापूर जिल्ह्यात ९९९६ मुलींना लाभ; ‘या’ मुलींसाठी आहे योजना

Peanut Cookies Recipe: घरच्या घरी बनवा बिना ओव्हन शेंगदाणा बिस्किट्स, लहान मुले होतील आनंदी, लगेच नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 30 ऑक्टोबर 2025

Women's World Cup 2025: भारत - ऑस्ट्रेलिया फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भिडणार! सेमीफायनल Live कुठे अन् किती वाजता पाहाणार?

अग्रलेख : ‘अवकाळी’ राजकारण

SCROLL FOR NEXT