MDH Masala sakal
देश

MDH Masala : साधा टांगेवाला कसा बनला देशाचा मसाला किंग, वाचा MDH आजोबांचा जीवनप्रवास

आजच्याच दिवशी वयाच्या 98 वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते

निकिता जंगले

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय नाव म्हणजे ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी. गुलाटी एक उद्योग क्षेत्रातील असं व्यक्तीमत्त्व आहे ज्यांनी कित्येक उद्योग करणाऱ्या व्यापारांना प्रोत्साहन दिले आहे. आज त्यांचा दुसरा स्मृतिदिन.

आजच्याच दिवशी वयाच्या 98 वर्षी धर्मपाल गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचा एकंदरीत जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. देशाचे मसाले किंग म्हणून आजही त्यांची विशेष ओळख आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे मसाला किंग आधी कोण होते, यांचा जीवनप्रवास कसा होता? आज आपण या विषयीचं जाणून घेणार आहोत.

धर्मपाल गुलाटी हे मुळात पाकिस्तानचे. 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एका साधारण कुटूंबामध्ये त्यांचा जन्म झाला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते भारतात आले कसे? 1947 च्या भारत-पाक फाळणीदरम्यान ते भारतात आले. तेव्हा त्यांच्या खिशात फक्त1500 रुपये होते.

मग काय दोन वेळंच पोट भरण्यासाठी त्यांनी टांगा चालवायला सुरुवात केली. टांगा चालवत त्यांनी पैसे कमावले आणि या पैशातून त्यांनी दिल्लीत मसाल्याचं दुकान उघडलं. व्यापारी क्षेत्रात हे त्यांचं पहिलं पाऊल होतं.

या दुकानाच्या मेहनतीवर त्यांनी मसाला कंपनी उभी केली. या मसाला कंपनीचं नाव होतं एमडीएच. एमडीएच ही जगप्रसिद्ध मसाला कंपनी आहे. या कंपनीचे एकूण 18 कारखाने आहे. या मसाला कंपनीमुळेच त्यांची देशभर मसाला किंग म्हणून ख्याती आहे.

वयाच्या 98 वर्षी जरी त्यांनी श्वास घेतला तरी ते खूप तंदरुस्त आणि हेल्दी होते. ते पहाटे सकाळी 4 वाजता उठायचे त्यानंतर नेहरू पार्कमध्ये जाऊन 1000 पाऊले चालायचे. पुन्हा घरी येऊन योगासनेही करायचे. त्यामुळे वयाची शंभरी जवळ येत असताना ते नेहमीच एनर्जेटीक रहायचे. ते नेहमी म्हणायचे ‘अभी तो मै जवान हूँ'

धरमपाल गुलाटी यांनी फक्त पाचव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलं. मात्र उद्योग क्षेत्रातील त्यांचं योगदान हे अविस्मरणीय आहे. धंधा करायला शिक्षण नाही तर त्याविषयी ज्ञान हवं असतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं. याशिवाय गुलाटी नेहमी त्यांच्या सॅलरीमधील 90 टक्के दान करायचे. ते 20 शाळा आणि1 हॉस्पिटल चालवायचे. धर्मपाल गुलाटी यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्ल तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आले होते.

मसाला किंग धरमपाल गुलाटी हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे. जे उद्याेग क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्यांना सतत प्रेरणा देणार. वयाच्या 98 वर्षापर्यंत त्यांनी उद्याेग क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी प्रत्येकांच्या स्मरणात राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT