Modi Government, congress, mnrega,labours
Modi Government, congress, mnrega,labours  
देश

काँग्रेसच्या महत्त्वकांक्षी 'मनरेगा' योजनेला भाजप सरकारने दिली संजीवनी!

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या आणि यापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या म योजनेवरुन काँग्रेसची खिल्ली उडवली होती, त्या योजनेला मोदी सरकारने कोरोना संकटासाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. स्थलांतरित मजूरांसाठी मनरेगाअंतर्गत 10,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या योजनेतील मजूरी 182 रुपयांवरून 200 रुपये करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच 'मनरेगा'योजनेवरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात यापूर्वी आरोप प्रत्यारोप झाले आहेत. मोदी सरकारच्या जनधन योजनेपेक्षा मनरेगा कित्येक पटीने चांगली आहे, अशी चर्चाही यापूर्वी रंगली होती. गरिबांसाठी लाभदायी असलेली ही योजना मोदी सरकार बंद करण्याचा विचार करत आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला होता. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाष्यही केले होते.  मनरेगा योजना कधीच बंद करु नये असे माझे मत आहे. ही योजना काँग्रेसला  (Congress) त्यांच्या अपशाची आठवण करुन देत राहिल. देश स्वातंत्र्य होऊन 60 वर्षानंतरही लोकांवर खड्डे खणण्याची वेळ येते हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या मनरेगा योजना ही हास्यास्पद असल्याचे म्हटले होते.     

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजसंदर्भातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत मनरेगाचा उल्लेख केला. मोदी सरकारच्या Modi Government या निर्णयाबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका श्रीनाटे यांनी समाधान व्यक्त केले आहे. काँग्रेसची योजना गरिबांसाठी नव संजीवनी देण्याच्या कामाला उपयुक्त ठरत आहे, याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया प्रियांका  श्रीनाटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरील चर्चेदरम्यान दिली. ज्या योजनेवरुन भाजप-काँग्रेस यांच्यातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत होते. त्याच काँग्रेसच्या महत्त्वकांक्षी योजनेला मोदी सरकारने आर्थिक संकटाचा सामना करत असताना नव संजीवनी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT