morming.jpg
morming.jpg 
देश

देशात सलग चौथ्या दिवशी लाखांहून अधिक कोरोना रुग्ण ते बंगालमध्ये मतदान सुरु , ठळक बातम्या क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाला थोपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. तरीही रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. दरम्यान, सलग चौथ्या दिवशी देशात 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळून आल्याने देशात चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे कोरोना पॅझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.


नवी दिल्ली- कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. शनिवारी कोरोना रुग्णाची विक्रमी नोंदणी झाली आहे. मागील 24 तासांत तब्बल 1.45 लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक 1 लाख 45 हजार 384 नवीन प्रकरणे समोर आली आहे. वाचा सविस्तर


कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान आज (दि.10) सकाळी सात वाजता सुरु झाले. या टप्प्यात 5 जिल्ह्यातील 44 जागांवरील उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदान केंद्रांवर सकाळापासूनच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील टप्प्यात काही किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. वाचा सविस्तर


मुंबई- ऑनलाईन पद्धतीने मागविलेले जेवण व अत्यावश्यक पुरवठ्याची घरपोच सेवा 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे स्विगी आणि झोमॅटोमधील कर्मचारी पार्सल घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट ते घरपोच सेवा देऊ शकतात. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. कर्मचाऱ्याने चाचणी केली नाही, तर त्याला कामावर रुजू करण्यात येणार नाही. वाचा सविस्तर


पुणे- कोरोना विषाणूवरील स्पाईक प्रथिनाला प्रतिबंध करणाऱ्या आठ औषधांचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला असून, पुढील कार्यवाहीसाठी या औषधांच्या वैद्यकीय चाचण्या होणे आवश्यक आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) भुवनेश्वर येथील विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्राने केलेले हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. वाचा सविस्तर


लंडन- जगात अनेक देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार सुरु आहे. जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असूनही अद्याप कोरोना आटोक्यात आलेला नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु झाल्यापासून यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहेत. आताही एक संशोधन समोर आलं असून त्यामध्ये सुर्यकिरणं आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर


नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे किंग्जवे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर


मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विषाणूवर मात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले.  शिवाय नाईट कर्फ्यूही लागू आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वप्रकारची खरबदारी घेतली जात आहे. वाचा सविस्तर


पॅरिस-  फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल. ५५ वर्षांखालील वयोगटासाठी हा निर्णय असून तो सुमारे पाच लाख ३३ हजार नागरिकांना लागू होईल. दुष्परिणाम टाळण्याचा यामागील उद्देश आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गेल्या महिन्यात ५५ वर्षांवरील वयोगटासाठी केवळ अॅस्ट्राझेनेकाच्या लसीची शिफारस केली होती. वाचा सविस्तर

नागपूर- अमरावती मार्गावरील वाडी येथील वेलट्रीट रुग्णालयात शुक्रवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, इतर रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने त्यांचे जीव बचावले. रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या अतिदक्षता कक्षातून ही आग पसरली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. वाचा सविस्तर

मुंबई- गुरु या चित्रपटानंतर अभिषेक बच्चनवर अभिनेता म्हणून शिक्का बसला. असे म्हणता येईल. यापूर्वी त्यानं जेवढे चित्रपट केले त्यात त्याच्या वाट्याला यश काही आलं नाही. केवळ महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून त्याची ओळख प्रस्थापित होऊ लागली होती. त्यातून बाहेर पडण्याचा अभिषेकनं प्रयत्न केला खरा. मात्र त्यातही त्याला अपयश आलं. वाचा सविस्तर

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT