नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने 294 जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले. त्यामुळे आज नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी भाजपसह एनडीएच्या सुमारे 80 खासदारांनी मंत्रपदाची शपथ घेतली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. याचबरोबर देशभरातील कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थीती होती.
पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी आणि जेपी नड्डा यांना राष्ट्रपतींनी शपथ दिली.
यावेळी नरेंद्र मोदी यांना कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधानांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवन संकुलात आयोजित या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार विशेष पाहुणे उपस्थित होते.
भारतासोबतचे संबंध ताणले गेल्याने चर्चेत असलेले मालदीवचे राष्ट्रपती आज भारताचे राज्य पाहुणे आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थीत होते.
मोदींच्या नव्या सरकारमध्ये 31 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये गडकरी यांचा क्रमांक चौथा तर गोयल यांचा क्रमांक अकरावा होता.
दरम्यान स्वतंत्र कार्यभार असलेल्या सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये शिंदे गटाच्या प्रताप जाधव यांनी चौथ्या क्रमांकवार शपथ घेतली.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात तब्बल 36 राज्यमंत्री असणार आहेत. यात महाराष्ट्रातील 3 राज्यमंत्री आहेत. यावेळी आरपीआयच्या आठवले यांनी पाचव्य, भाजपच्या रक्षा खडसे यांनी 26 व्या आणि मुरलीधर मोहोळ यांनी 34 व्या क्रमांकावर शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.