Startup  Sakal
देश

यंदापासून १६ जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस

दरवर्षी १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दरवर्षी १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. स्टार्टअप संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात व तळागाळात पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे दीडशे स्टार्टअप (नवउद्यमी) उद्योजकांशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी यांनी ही माहिती दिली. (National Startup day 16 January)

‘‘ भारतीय स्टार्टअप हे परिवर्तन घडवून आणत आहेत. ते उद्याच्या भारताचा प्रमुख आधारस्तंभ आहेत. भारतात साठ हजारांच्या आसपास स्टार्टअप असून त्यांनी देशासमोरील आव्हाने स्वीकारावीत. त्यांनी देशातच राहून देशाकरिता नव्या कल्पना अमलात आणाव्यात’’ असे आवाहनही मोदी यांनी केले.

उद्योजकांना व स्टार्टअपना उद्योग-व्यवसाय करणे सोपे व्हावे म्हणून सरकारने उचललेल्या पावलांची माहितीही मोदी यांनी या वेळी दिली. ‘‘सरकारी लालफीतशाहीच्या जंजाळातून उद्योजकांना मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवउद्यमींना प्रोत्साहन मिळेल असे संस्थात्मक वातावरण निर्माण केले जाईल व त्यांना आवश्यक ते सर्व साह्य केले जाईल.’’ असेही त्यांनी सांगितले.

अशीही पेटंट भरारी

देशात २०१३-१४ मध्ये चार हजार पेटंट देण्यात आली होती. त्या तुलनेत गेल्या वर्षी २८ हजार पेटंट दिली गेली. २०१४ मध्ये ७० हजार ट्रेडमार्कची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षीही संख्या अडीच लाख एवढी झाली. याच कालखंडात कॉपीराईटचा आकडाही चार हजारांवरून चौपट वाढल्याचे मोदी यांनी नमूद केले. जागतिक नवकल्पनांच्या निर्देशांकात याच कालावधीत भारताचा क्रमांक ८१ वरून ४६ पर्यंत वर गेल्याचेही ते म्हणाले.

जागतिक भरारीचे ध्येय ठेवा

स्टार्टअप हे नव्या संकल्पना आणण्याबरोबच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही करीत आहेत. त्यांनी आपली स्वप्ने स्थानिक पातळीवरच मर्यादित ठेवू नयेत तर जागतिक पातळीवर उड्डाण करण्याचे ध्येय त्यांनी ठेवावे. विजेवरील वाहनांची चार्जिंग व्यवस्था, संरक्षणविषयक उत्पादने, ड्रोन-चिप आदींचे उत्पादन, नागरी नियोजन या विषयावर स्टार्टअपने लक्ष केंद्रित करावे. आज ग्रामीण भागही इंटरनेटने जोडलेला असल्याने विकासाबाबतच्या त्यांच्या आशा-आकांक्षांकडेही स्टार्टअपने लक्ष द्यावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT