Navjot Singh Sidhu And Arvind Kejriwal
Navjot Singh Sidhu And Arvind Kejriwal Team eSakal
देश

स्वतःच्या जीवाची चिंता, मात्र पंजाबींचे काय? सिद्धूंचा केजरीवालांवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी (ता.एक) पंजाबच्या भगवंत मान सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस नेत्याला मारहाण प्रकरणात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरोपी सांगत सिद्धू म्हणाले, की हे भगतसिंग यांच्या विचारधारेस विसंगत वर्तन आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, केजरीवालजी (Arvind Kejriwal) तुमच्या जीवाला धोक असल्याने तुमचे लोक दिल्लीतील न्यायालयात जात आहेत. मात्र पंजाबी (Punjab) लोकांच्या जीवाचे काय ? पंजाबच्या पटियालाच्या सनौरमध्ये एक काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यावरुन नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पंजाबच्या आप (Aap) सरकारवर निशाणा साधला आहे.(Navjot Singh Sidhu Criticize Arvind Kejriwal Over Congress Party Worker Assault Case)

पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप त्यांनी केला. दुसरे आप कार्यकर्त्यांकडून झालेले कृत्य भगतसिंग यांच्या विचारधारेशी जुळत नाही. केजरीवालजी, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून तुमचे लोक दिल्लीतील न्यायालयात जात आहेत. तुम्हाला वाटत नाही का पंजाबी लोकांच्या जीवाचीही चिंता करायला हवी ? जर हे दिल्लीत घडले असते तर तुम्ही त्यास क्रूरता म्हटले असते. पाहा पंजाबमध्ये काय घडत आहे. आणखीन एक काँग्रेस कार्यकर्त्याला सनौरमध्ये बेदम मारहाण केली गेली. कायदा व सुव्यवस्था पार ढसळली आहे.

सिद्धू म्हणाले, बदल जरुर झालेला नाही. हा बदल ज्या वर पंजाबच्या लोकांनी मोहर उमठवली होती. हत्या, बंदुका दाखवून कार चोरी, मारामारी यासह इतर कामे करणारे आपचे कार्यकर्ते नियंत्रणा बाहेर गेले आहेत. यापूर्वी गुरुवारी सिद्धूने आरोप लावला होता, की जिराच्या कसोवना गावात आप कार्यकर्त्यांनी इकबालसिंग नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या केली होती. ते म्हणाले होते, की जीराच्या कसोवना गावात काँग्रेस कार्यकर्ता इकबाल यांची निर्दयतेने हत्या करणाऱ्या आप कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाईची आता प्रतिक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT