Mumbai
Mumbai Sakal
देश

Omicron : वॉर रूम पुन्हा सज्ज करा; केंद्राचे राज्यांना पत्र

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशातील वाढत्या ओमिक्रॉन (Omicron) रूग्णसंख्येमुळे केंद्र आणि विविध राज्यांकडून खबरदारीच्या सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron omicron 3 times more transmissible than delta) यापूर्वी आलेल्या डेल्टापेक्षा (Delta Variant) गंभीर असून याचा संसर्ग तिप्पट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी वॉर रूम (War Room For Omicron) पुन्हा सक्रीय करा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना मंगळवारी (21 डिसेंबर) पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

कोरोनाच्या नव्या (Corona New Variant) व्हेरिएंटशिवाय या पूर्वी आलेल्या दुसऱ्या लाटेत धुमाकूळ घातलेला डेल्टा व्हेरिएंट (Corona Second wave) अद्यापही देशातील काही राज्यांमध्ये सक्रीय असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे दूरदृष्टीचा अवलंब करून, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. व्हायरसचा ट्रेंड आणि संसर्गाची ठिकाणे यासंबंधीच्या डेटाचे बारकाईने परीक्षण करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये कार्यक्रमांवर बंदी

वाढत्या ओमिक्रॉनच्या (Omicron Cases in Karnataka) रूग्णसंख्येमुळे कर्नाटकमध्ये 30 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत कोणत्याही पक्षाला किंवा कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाहीये. त्याशिवाय नवीन वर्ष साजरे करण्याबाबत अनेक निर्बंध लादण्यात आले आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. तर, चेन्नईनेही स्थानिक एजन्सींना समुद्रकिनार्‍यांवर गर्दी होऊ नये यासाठी विविध खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईत कार्यक्रम टाळण्याचे आवाहन

राज्यातील ओमिक्रॉनची (Omicron In MUmbai ) वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत बीएमसीने मुंबईतील नागरिकांना ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच विवाहसोहळा आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच जास्त गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, बार आणि इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचेदेखील आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT