sidhu moose wala
sidhu moose wala  sakal
देश

सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्याने एकेकाळी सलमानला देखील मारण्याची धमकी दिली होती

सकाळ ऑनलाईन

प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंह सिद्धू म्हणजेच सिद्धू मूसेवालाची रविवारी संध्याकाळी खूलेआम गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानसा जिल्ह्यातील जवाहरके या त्याच्या गावातचं हा हल्ला झाला. AK-४७ चा वापर करुन ३० ते ४० गोळ्या झाडत मुसेवालाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या एक दिवस आधीच सिद्धू मुसेवालाची व्हीआयपी सिक्युरिटी कमी करण्यात आली होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

या हल्ल्यांनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली आहे. हत्येनंतर तीन तासांनी गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्ट टाकून या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हंटल कि, माझ्या एका मित्राच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव पुढे आले होते, पण पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्या ओळखीमुळे तो वाचला आणि सरकारने त्याला शिक्षा केली नाही. म्हणून मी आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने ही हत्या केली.

दरम्यान, मुळसेवालाची हत्या केल्याची जबाबदारी घेणारा सतींदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईचा खास मानला जातो. गेल्या वर्षी फरीदकोट जिल्ह्यातील न्यायालयाने युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पहेलवान (३४) यांची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

यासोबतच गुरुग्राममधील परमजीत आणि सुरजीत नावाच्या दोन भावांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडात सुद्धा गोल्डी ब्रारचे नाव समोर आले होते. या वर्षी मार्चमध्ये दिल्ली पोलिसांनी कला जाठेदी, लॉरेन्स बिश्नोई आणि नरेश सेठी टोळीच्या दोन शार्प शूटर्सना अटक केली होती.

२ मे रोजी पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या तीन साथीदारांना भटिंडा येथून अटक केली. खंडणी न दिल्याने ते माळवा भागातील एका व्यावसायिकावर हल्ल्याचा प्लॅन करत होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गेल्या वर्षी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला होता. त्यानंतर पोलिसांनी आंतरराज्यीय सिंडिकेट चालविण्यासंदर्भातील एका प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.

एकेकाळी विद्यार्थी नेता असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने कॉलेजमध्येच पहिली टोळी तयार केली. त्याच्यावर २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. किमान सहा राज्यांमध्ये पसरलेल्या बिश्नोई टोळीत ६०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यात खेळाडूंपासून पोलिसांची मुलं आणि स्थानिक विद्यार्थ्यांचा समावेश होता.

बिश्नोईने सगळ्यात आधी पंजाब आणि हरियाणामध्ये आपले नेटवर्क तयार केले आणि नंतर बाकीच्या राज्यांमध्ये पसरवले. २०१६ मध्ये बिश्नोईवर काँग्रेस नेत्याच्या हत्येचा आरोप होता. त्याने फेसबुकच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. पण लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला तो २०१८ मध्ये. लॉरेन्स बिश्नोईने संपत नेहराला अभिनेता सलमान खानला मारायला सांगितले होते.

यामागचं कारण म्हणजे सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. लॉरेन्स हा स्वतः बिश्नोई समाजाचा आहे ज्यांच्यासाठी काळवीट खूप महत्वाचे मानले जाते. सलमान खानला मारून लॉरेन्स बिश्नोईला काळवीटाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. बिश्नोई आणि नेहरा यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल करत जून २०१८ मध्ये त्यांना बेंगळुरू येथून अटक करण्यात आली होती.

लॉरेन्स बिश्नोईने प्रत्येक राज्यातील स्थानिक गुंडांशी हातमिळवणी करून राष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी सिंडिकेट तयार करण्याचा प्लॅन केला होता. जेणेकरून उत्तर भारतातील अंडरवर्ल्डवर कंट्रोल ठेवता येईल. त्यामुळे बिष्णोईने कला जाठेदी आणि नरेश सेठी या गुंडांशी हातमिळवणी केली. फक्त देशातच नाही तर परदेशातही या बिश्नोई गँगचे जाळे पसरले आहे.

माहितीनुसार, गुन्हेगारांची ही टोळी मेक्सिको, इटली आणि थायलंडमधील त्यांच्या साथीदारांसह खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, जमीन हडप आणि खून करतात. बॉलिवूड सेलिब्रिटी, पंजाबी गायक आणि अभिनेते या टोळीचे टार्गेट आहेत.

दरम्यान, सिद्धू मुसेवालाची आई चरणजित कौर यांनी आपल्या मुलाच्या हत्यासाठी भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल जबादार असल्याचं म्हंटल आहे. मुसेवालाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाची सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्याच्या ४ सुरक्षा रक्षकांपैकी दोघांना कमी करण्यात आले होते. पण हल्ला झाला त्यावेळी पंजाब पोलिसांचे दोन्ही कमांड सिद्धू सोबत नव्हते. तर भगवंत मान यांच्या बहिणीच्या सुरक्षेसाठी २० सिक्युरिटी गार्ड आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT