Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi: आधी मिशन तेलंगणा मग मोदीचे सरकार, विधानसभा विजयाचा राहुल गांधींना विश्वास

Chinmay Jagtap

Telangana Election: ‘‘ तेलंगणमध्ये काँग्रेस पक्षाचे तुफान पाहायला मिळणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव होईल. राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे,’’ असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते खम्मम जिल्ह्यातील पिनापाका येथे आयोजित सभेत बोलत होते.

राहुल म्हणाले, ‘‘ राज्यामध्ये सगळीकडे भारत राष्ट्र समितीने केलेला भ्रष्टाचार पाहायला मिळतो आहे. राज्यामध्ये लोकांचे सरकार स्थापन करणे हा काँग्रेस पक्षाचा मुख्य हेतू आहे. येथे सत्ताबदल झाल्यानंतर आम्ही केंद्रातील मोदींचे सरकार पाडू. खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनाही राज्यात काँग्रेसचे तुफान येणार असल्याचे ठावूक आहे.

काँग्रेसने काय केले? असा सवाल मुख्यमंत्री करतात पण त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या शाळा आणि महाविद्यालयात तुम्ही शिकला आहात त्याची निर्मिती आम्ही केली आहे.

तुम्ही ज्या रस्त्यावरून प्रवास करत आहात, तो रस्ता आम्ही बांधला आहे. तेलंगणला वेगळ्या राज्याचा दर्जा देखील काँग्रेसकडून देण्यात आला. हैदराबादला आम्ही आयटी कॅपिटल केले. आताचा संघर्ष हा राजाविरुद्ध प्रजा असा आहे.

मलाईदार खाती मुख्यमंत्र्यांकडे

‘‘ सध्या ज्या खात्यामधून पैशांची कमाई होते ती सगळी खाती ही मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या हातामध्ये आहेत. मद्यापासून महसुलापर्यंत सगळे काही मुख्यमंत्र्यांकडे आहे. राज्यातील जनतेने वेगळ्या तेलंगण राज्याचे स्वप्न पाहिले होते पण आता केसीआर मात्र एकाच कुटुंबाचे भले करताना दिसतात. केसीआर यांनी लोकांचे एक लाख कोटी रुपये लुटले आहेत,’’ असे राहुल म्हणाले.

ते तिघे एकच आहेत

‘‘राज्यामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस), भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतच ‘बीआरएस’ने केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला होता. काँग्रेस ज्या ठिकाणी उमेदवार उभा करतो आहे त्या ठिकाणी ‘एमआयएम’चा उमेदवार उभा राहिलेला दिसतो,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT