President Draupadi Murmu esakal
देश

Draupadi Murmu : राष्ट्रपतींच्या पाया पडणं आलं अंगलट; गंभीर चूक समजून महिला अभियंत्याचं तात्काळ निलंबन

महिला अभियंत्यानं राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून प्रोटोकॉल मोडला.

सकाळ डिजिटल टीम

गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागानं (Department of Health Engineering) या महिला अभियंत्याला (Women Engineer) निलंबित केलं.

4 जानेवारीला एका कार्यक्रमादरम्यान सुरक्षा प्रोटोकॉलचं (Security Protocol) उल्लंघन करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजस्थान सरकारमधील (Rajasthan Government) एका महिला अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय.

गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागानं (Department of Health Engineering) या महिला अभियंत्याला (Women Engineer) निलंबित केलं. विभागाचे मुख्य अभियंता (प्रशासन) यांच्या आदेशात म्हटलंय, विभागाच्या कनिष्ठ अभियंता अंबा सियोल यांनी 4 जानेवारीला रोहेत इथं स्काऊट गाईड जांबोरीच्या (Scout Guide Jamboree) उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या (President Draupadi Murmu) पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून प्रोटोकॉल मोडला. त्यांना राजस्थान लोकसेवा नियमांनुसार तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलंय.

अंबा सियोल ह्या वॉटर सिस्टीम पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी आल्या होत्या. परंतु, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या अधिका-यांच्या पुढच्या रांगेत पोहोचण्यासाठी राष्ट्रपतींचा सुरक्षा घेरा फोडण्यात त्यांना यश आलं. त्यांनी पुढं जाऊन राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं.

President Draupadi Murmu

स्थानिक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयानं ही घटना राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गंभीर चूक असल्याचं सांगत राजस्थान पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT