देश

दिल्लीतील राजपथावर अखेर महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे.

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Tableau) सहभागी होणार होता. परंतु सुरक्षेच्या कारणावरून केंद्र सरकारने (Central Government) या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती. आता पुन्हा केंद्राने आपला निर्णय बदलला असून राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या (Maharashtra) चित्ररथाला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. (Republic Day 2022)

महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे. जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढाळणाऱ्या विविध सजीव प्रजातींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का, हे देखील पाहावे लागेल. ((Republic day 2022 Rajpath Parade)

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या रथालाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका (Narendra Modi) केली. तसेच त्यांना पत्रही पाठवले होते. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या अशा वागण्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणे हे संतापजनक असल्याचं म्हटंल होतं.

२६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. २०१५मध्ये 'पंढरीची वारी' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT