झोपडीत राहणाऱ्या गरीब कुटुंबावर ८२ हजाराचे विज बिल टिम ई सकाळ
देश

धक्कादायक! झोपडीत राहणाऱ्या गरीब कुटुंबावर ८२ हजाराचे विज बिल

विज विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, राजस्थान येथील घटना

सकाळ डिजिटल टीम

राजस्थान : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परीणाम पडला. यात विज विभागाला सुध्दा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. मात्र काही ठिकाणी विज विभागाचा गलथान कारभारसुध्दा दिसून आला. अशीच एक घटना राजस्ठान येथील भीलवाडा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. इथल्या एका गरीब कुटुंबाला तब्बल ८२ हजार २५८ रुपयांचे बिल आले आहे. हे कुटुंब एका छोट्याश्या झोपडीत राहतात. कोरोना काळात अनेकांना भरमसाठ विजेचे बिल आल्याच्या अनेक घटना समोर आल्या. मात्र झोपडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबावर एवढे मोठे बिल आल्याने सर्वांना मोठा धक्का बसलाय.

या कुटुंबाने एक वर्षाआधीच मीटर बदलण्याची मागणी केली होती. मागील महिन्यातसुध्दा या कुटुंबाला सात हजार रूपये बिल आले होते तर या महिन्यात चक्क जवळपास ८२ हजार बिल आल्याने विज विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. अजमेरच्या या विज विभागाने भिलवाडा जिल्ह्यातील गांगलास गावात राहणाऱ्या लाला रेगर नावाच्या गरीबावर ८२ हजाराचे बिल पाठविल्याने या गावातील ग्रामस्थानासुध्दा आश्चर्य वाटत आहे.

मीटर खराब झाल्याने हे बिल आल्याचे लाला रेगर यांचा मुलगा रतन रेगर यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी सुध्दा असेच जास्त बिल आले होते. मीटर बदलण्याकरीता अर्ज सुध्दा केला होता. मात्र अद्याप कोणी मीटर बदलायला आले नाही तर हे हजारो रूपयांचे बिल कमी करण्यासाठी विज विभागाच्या कार्यालयाच्या आपण फेऱ्या मारत असल्याचे सुध्दा रतन रेगर यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

मी मराठी नाही, माझं आडनाव राघवन नाही... सुमीत राघवनने पहिल्यांदाच सांगितलं त्याचं खरं नाव; म्हणाला- आम्ही...

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

Gautam Gambhir: श्रीलंका दौऱ्याआधी गंभीरचा टीम इंडियाला स्पष्ट संदेश; “पहिल्या दिवसापासून तयार राहा”, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT