Son killed his father by paying a ransom Son killed his father by paying a ransom
देश

वडिलांच्या अनैतिक संबंधाचा राग; मुलाने खंडणी देत केला खून

सकाळ डिजिटल टीम

वडील संजय मंडल (५२) यांचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलाला लागली. यामुळे चिडलेल्या मुलाने ७० हजारांची खंडणी (ransom) देऊन वडिलांचा खून (Murder) केला. तसेच वडिलांसोबत राहणाऱ्या महिलेला या प्रकरणात गोवण्याचा कट रचला. ही घटना बिहारमधील मुंगेरमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी मुलगा सत्यवीर कुमार ऊर्फ ​​छोटू याला पोलिसंनी अटक केली आहे. (Son killed his father by paying a ransom)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी शामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय मंडल (५२) या इसमाची हत्या करण्यात आली होती. झोपेत असताना हा हल्ला करण्यात आला होता. वडिलांच्या हत्येनंतर मुलाने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून वडिलांसोबत राहणाऱ्या महिलेसह अन्य चार अज्ञात लोकांविरुद्ध संशय व्यक्त केला हेता.

मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला अटक करून कारागृहात पाठवले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली असता सत्य काही वेगळेच निघाले. शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना कळले की, ही हत्या महिलेने केलेली नाही. यामुळे पोलिसांना सखोल तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान संजय यांची हत्या मुलांनी केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला असता लहान मुलगा सत्यवीर कुमार ऊर्फ ​​छोटू याने खून केल्याचे पुढे आले, असे एसपी जग्गुनाथ रेड्डी यांनी सांगितले.

बापाने मुलांना घराबाहेर हाकलले

संशयाच्या आधारे सत्यवीर कुमार ऊर्फ ​​छोटू याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सहा वर्षांपूर्वी आईला जाळून मारले होते. त्यानंतर वडिलांनी विवाहित महिलेला घरात ठेवण्यास सुरुवात केली. वडील आणि महिलेने मिळून त्याला आणि त्याच्या भावाला घरातून हाकलून दिले होते. तसेच मालमत्ता विकून आनंदाने राहू लागले होते, असे छोटूने पोलिसांना सांगितले.

७० हजारांजी खंडणी

११ मे रोजी लग्नासाठी घरी आल्यावर छोटूने वडिलांच्या हत्येचा कट रचला आणि ७० हजारांची खंडणी (ransom) असरगंज येथील तीन गुन्हेगारांना दिली. खंडणी घेतल्यानंतर गुंडांनी संजय यांची हत्या (Murder) केली. त्यानंतर कट रचून महिलेला यात गोवले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केल्यानंतर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT