मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका नवविवाहित महिलेने हनिमूनला पतीसमोर असे सत्य उघड केले, ज्यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचे पत्नीने पतीला सांगितले. हे ऐकल्यानंतर पतीने दुसऱ्या दिवशी पत्नीला सोडले आणि विवाह रद्द ठरवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात 3 वर्षे चालले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेत हा विवाह अवैध घोषित करण्याचे आदेश दिले. (The bitter truth told by the wife on the first night of the wedding; The husband took this step)
वास्तविक, ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातील २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर हनिमूनच्या वेळी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से सांगितले. यादरम्यान पत्नीने पतीला एक अशी गोष्ट सांगितले की ती ऐकून तिचा संसार धोक्यात आला. लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचे पत्नीने पतीला सांगितले. ही बाब पतीला कळताच तो हैराण झाला. त्याने हा प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांच्या संमतीने पतीने पत्नीला माहेरी सोडले आणि पुन्हा तिला आणण्यासाठी गेला नाही. हे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. हे सत्य सर्वांसमोर आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
कौटुंबिक न्यायालयाने विवाह 'रद्द' घोषित केला-
पत्नीच्या मामाच्या मुलानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले. लग्न मोडल्यानंतर पीडितेने आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला, मात्र त्यानंतरही पती तिला ठेवण्यास तयार नव्हता. या प्रकरणी पतीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द ठरवण्यासाठी अर्ज केला. याप्रकरणी पत्नीला तिचा जबाब देण्यासाठी अनेकवेळा नोटीस देण्यात आली, मात्र ती आली नाही. त्यानंतर न्यायालयाने हा विवाह रद्द ठरवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.