Belgaum Black Day esakal
देश

Belgaum Black Day : बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागात आज काळा दिन; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी!

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा.

सकाळ डिजिटल टीम

प्रशासनाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना बेळगावात येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रवेशबंदी जाहीर केली आहे.

बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी (ता. १) काळा दिन (Black Day) पाळण्यात येणार आहे. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा.

तसेच, धर्मवीर संभाजी उद्यान येथून सकाळी नऊ वाजता निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) केले आहे. गेल्या काही दिवसांपासून काळा दिनाबाबत शहर आणि परिसरात जनजागृती करण्याचे काम समितीतर्फे हाती घेतले आहे.

तसेच, ठिकठिकाणी बैठका घेऊन फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वच भागांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून, बेळगाव शहर आणि तालुक्याच्या विविध भागांतील कार्यकर्त्यांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाल्यानंतर शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे.

त्यानंतर मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन केले असून, समितीचे नेते यावेळी मराठी भाषिकांना मार्गदर्शन करतील. प्रशासनाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना बेळगावात येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्याबाबत मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त करीत कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक प्रवेशबंदी लागू करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले.

फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करावेत, तसेच फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर समिती, तालुका समिती, युवा समिती, शिवसेना व महिला आघाडीने केले आहे.

फेरीचा मार्ग असा

फेरीची धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरुवात होईल. तानाजी गल्ली रेल्वे गेट, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, तासीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, मराठा मंदिर येथे सांगता होईल.

धर्मवीर संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या फेरीमध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने व शांततेत सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी. सर्वांनी हा दिवस गांभीर्याने पाळून महाराष्ट्रात जाण्यासाठी आजही तत्पर असल्याचे दाखवून द्यावे.

- मनोहर किणेकर, माजी आमदार, कार्याध्यक्ष मध्यवर्ती म. ए. समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT