The Kashmir Files Sakal
देश

'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये दंगा; दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

तेलंगणातील थिएटरमध्ये 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सुरू असताना दोन बदमाशांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणा: विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. काश्मिरी पंडितावर झालेला अत्याचार, त्यांचे विस्थापन यावर प्रामुख्यानं या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. सध्या देशभरात थिएटर मध्ये 'द काश्मीर फाईल्स' ला नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अशातच तेलंगणातील थिएटरमध्ये 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सुरू असताना दोन बदमाशांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या तर अचानकपणे अशा घोषणा देण्यात आल्यानं सिनेमागृहातील वातावरणात तणाव निर्माण झाला. त्यातून तिथं हाणामारी झाली,याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (Two miscreants chanted pro pakistan slogans during the kashmir files screening in a telangana theatre)

1990 च्या दशकात काश्मिरी पंडितावर झालेले अत्याचार, त्यांना दिलेला त्रास किंवा काही पंडित काश्मीर सोडून गेले तर काहींची हत्या झाली याविषयी बरंच बोलले जाते तर आतापर्यंत या मागे झाकून ठेवलेले सत्य 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. या चित्रपटाच्या कथानकावर वादविवाद होत आहे तर काही लोक निर्मात्यांवर कथितपणे 'प्रचार' संदेश पसरवल्याचा आणि विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा आरोप करत आहे.

तेलंगणा राज्यामध्ये हा सिनेमा एका थिएटरमध्ये दाखवला जात होता. त्यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आला. अचाकनकपणे अशा घोषणा देण्यात आल्यानं सिनेमागृहातील वातावरणात तणाव निर्माण झाला. त्यातून तिथं हाणामारी झाली. या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे संपुर्ण प्रकरण चित्रित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT