two sons took their father dead body on bicycle in belgaum photo viral
two sons took their father dead body on bicycle in belgaum photo viral 
देश

मृतदेह सायकलवरून नेत असताना गाव फक्त पाहात राहिले...

वृत्तसंस्था

बेळगाव : एका वृद्ध व्यक्तीचा उपचाराअभावी घरातच मृत्यू झाला. पण, कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या भितीने मृतदेहाला हात लावण्यासही कोणी पुढे येईनात. खांदेकरी न मिळाल्याने दोन मुलांनी सायकलवरून मृतदेह नेला आणि अंत्यसंस्कार केला. मृतदेह सायकलवरून नेत असताना गाव फक्त बंद दरवाजाच्या आतून पाहात होते.

बेळगाव जिल्ह्यतील कित्तूर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एमके हुबळी गावातील 70 वर्षीय व्यक्तीची 15 ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडली होती. पण, या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे या वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर, वृद्धाचा घरामध्येच उपचाराअभावी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण, कोरोनाच्या भितीमुळे अंत्यसंस्कारासाठी कोणीच येत नव्हते. नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. यानंतर शववाहिका आणि इतर वाहने मिळवण्यासाठी मुलाने प्रयत्न केला. पण, वेळेवर तेही मिळाले नाही. अखेर, हताश झालेल्या मुलांनी मृतदेह सायकलवरून नेला आणि वडिलांवर अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कारावेळीही कोणीही उपस्थित राहिले नाही.

दरम्यान, मृतदेह सायकलवरून घेऊन जात असताना गावातील नागरिक बंद दरवाजाच्या आतून पाहात होते. पण, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. संबंधित छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर प्रशासनालाही जाग आली तर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिकेच्या अभावामुळे 5 किलोमीटरपर्यंत एक पत्नीने आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीवरून नेला होता. संबंधित छायाचित्र व्हायरल झाल्यानंतरही खळबळ उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT