Veerappan Death
Veerappan Death esakal
देश

Veerappan Death : वीरप्पनला पकडण्यासाठी केलेला बद्दल दोन अब्ज खर्च! असा रचलेला सापळा..

सकाळ डिजिटल टीम

Veerappan Death : खरंतर एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे दिसणारी ही कथा सत्य आयुष्यात घडली असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला पकडण्यासाठी सरकारने तब्बल 5 कोटींच बक्षीस जाहीर केलेलं होतं. भारतात दाऊदनंतर एवढी मोठी रक्कम लावली जाणारा हा एकमेव आतंकवादी होता.

या आतंकवाद्याच नाव कुजा मुनिस्वामी वीरप्पन असं होतं पण पूर्ण जग त्याला वीरप्पन म्हणून ओळखतं. त्याचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी कर्नाटकातील गोपीनाथम गावात झाला. त्याने 184 लोकांची हत्या केली होती. ज्यात 97 पोलिसांचा समावेश होता. त्याकाळात 2 अब्ज रुपये किमतीच्या एकूण 10,000 टन चंदनाची त्याने तस्करी केल्याचे सांगितले जाते. त्याला शोधण्यासाठी अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.

कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यांत त्याची सत्ता होती. या तीन राज्यातील 6 हजार चौरस किलोमीटरवर त्यांचे राज्य होते. त्या राज्यात प्रवेश करायचा असल्यास विरप्पनची परवानगी घेणे आवश्यक होते. अन्यथा त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित होता.

स्वतःच्याच मुलीचा घेतलेला जीव

नव्वदच्या दशकात वीरप्पनची गँग 100 हून अधिक लोकांनी बळकट झाली होती. तामिळनाडू पोलीस वीरप्पनसाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत होती. याच दरम्यान 1993 मध्ये वीरप्पनच्या पत्नीने मुलीला जन्म दिला होता. जंगल सुनसान असल्याने रात्रीच्या वेळी नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकायला येत होता.

बाहेर पोलीस आणि बाळाच्या रडण्याने कोड्यात पडलेल्या विरप्पनला शरण जाण्याऐवजी नवजात बाळाचा आवाज कायमचा बंद करणे अधिक धाडसी वाटलं . त्यामुळे त्याने स्वतःच्याच मुलीचा जीव घेतला. त्या बाळाचा मृतदेह वीरप्पनचा पाठलाग करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना सापडला होता.

तिन्ही राज्याचे पोलिस वीरपन्नला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्याला जंगलात मारणं कठीण होतं, त्यावेळी या सगळ्या प्रोजेक्टवरती 2004 साली के विजायकुमार यांना तैनात करण्यात आलं होतं. 2004 मध्ये तामिळनाडूमध्ये कुमार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काळजीपूर्वक नियोजित "ऑपरेशन कोकून" मध्ये या डाकूला ठार करण्यात आले.18 ऑक्टोबर 2004 रोजी, के विजयकुमार यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली वीरप्पन आणि त्याचे तीन सहकारी तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्स आणि एन.के. सेंथामराय कन्नन यांनी मारले.

असा रचला सापळा

वीरप्पनला जंगलाबाहेर काढण्यासाठी एसटीफनने एक युक्ती शोधून काढली. 2004 मध्ये डोळ्यांच्या उपचारासाठी जंगलाबाहेर येण्यासाठी एक अँब्युलेंस पाठवण्यात आली. या अँब्युलेंसमध्ये पोलीस वेषांतर करून सहभागी झाले होते. वीरप्पनला घेवून अँब्युलेंस निघाली. पण आपली ओळख लपवण्यासाठी वीरप्पनने झुपकेदार मिशाही कापल्या होत्या.

20 मिनीटात झाडल्या 338 गोळ्या

विरप्पन अँब्युलंसमध्ये बसला आणि त्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला. त्याला इच्छित स्थळी आणल्यावर एसटीएफचे दोन्ही जवान खाली उतरले. संपूर्ण टीम त्यावेळी त्याच्या स्वागताला बंदूक घेऊन उभी होती. स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास वीरप्पनला सागंण्यात आलं पण बंद अँब्युलंसच्या काचेतून वीरप्पनच्या साथीदारांनी पहिल्यांदा फायरिंग केलं. त्यानंतर एसटीफने चारी बाजूने अँब्युलंन्सवर फायरिंग केली. तब्बल वीस मिनटं चाललेल्या या चकमकीत 338 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. अँब्युलंसमधून फायरिंग बंद झालं. अँब्युलंसच दार उघल्यावर सगळे मेलेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT