Wearing Hijab Allowed in Exams Education Minister MC Sudhakar
Wearing Hijab Allowed in Exams Education Minister MC Sudhakar esakal
देश

Hijab Row : परीक्षेत हिजाब घालण्याची परवानगी देणार; शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, हिंदू विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता!

सकाळ डिजिटल टीम

काही हिंदू विद्यार्थ्यांनीही (Hindu Students) भगवा स्कार्फ घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

बंगळूर : कर्नाटकमधील उमेदवारांना स्पर्धात्मक आणि भरती संबंधित परीक्षांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी दिली जाईल, असे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री एम. सी. सुधाकर (Education Minister MC Sudhakar) यांनी सांगितले.

राज्याचे शैक्षणिक धोरण आणि रिक्त पदे भरण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी झालेल्या बैठकीनंतर सुधाकर यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, ‘हिजाबचा मुद्दा चर्चेचा भाग नव्हता. काहींना छोट्या छोट्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा आहे; परंतु आम्ही लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. नीटमध्ये देखील उमेदवारांना हिजाब (Hijab) घालण्याची परवानगी आहे,’ असे मंत्र्यांनी सांगितले.

‘मला वाटते, जे लोक विरोध करत आहेत, त्यांनी नीट परीक्षेच्या (Exam) मार्गदर्शक तत्त्वांची पडताळणी केली पाहिजे. मला माहीत नाही की ते यातून मुद्दा का काढत आहेत. परीक्षेसाठी जे हवे ते परिधान करण्याचा अधिकार आहे. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोक त्यांना हवे तसे कपडे घालण्यास मोकळे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय इतर संस्थांसह पाच महामंडळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी कर्नाटकात होणाऱ्या परीक्षांनाही लागू होईल, असे समजते. मागील वर्षी उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या सहा मुलींना वर्गात जाण्यापासून रोखल्यानंतर मुलींनी विरोध केला होता. त्याचा उद्रेक कर्नाटकात झाला होता. काही हिंदू विद्यार्थ्यांनीही (Hindu Students) भगवा स्कार्फ घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आणि लवकरच ही समस्या राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये पसरली.

उडुपीतील पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या आणि ११ दिवस चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालणे अत्यावश्यक नसल्याचे जाहीर करत हिजाबवरील बंदी कायम ठेवली, या पार्श्र्वभूमीवर श्री. सुधाकर यांनी हा निर्णय दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT