A reminder displaying important year-end tasks that must be completed before the 31 December deadline to avoid penalties or missed opportunities.

 

esakal

देश

31 December Deadlines : ३१ डिसेंबर पर्यंतच करून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे; परतपरत नाही मिळणार संधी!

essential year-end tasks before 31 December deadline : जाणून घ्या, नेमकी कोणती कामे पूर्ण करणे आहे आवश्यक?

Mayur Ratnaparkhe

Year-End Tasks to Complete Before 31 December : या वर्षातील हा शेवटचा महिना आहे. डिसेंबर महिना सुरू होताच, कर, कागदपत्रे आणि सरकारी योजनांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांची अंतिम मुदत जवळ येते. जसे की पॅन-आधार लिंकिंग, आयटीआर फाइलिंग, अ‍ॅडव्हान्स टॅक्स, आयटीआर रिटर्न किंवा दुरुस्त्या यासारखी कामे करून घेणे गरजेचे आहे.  कारण, सर्व कामांचा संबंध तुमच्या बँकिंग, गुंतवणूक आणि कर प्रोफाइलवर थेट परिणाम करत असतो.

ज्यांची टीडीएस नंतरची कर देणेदारी १० हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे अनिवार्य आहे. १५ डिसेंबर ही तिसरा हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख आहे. अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यास विलंब झाल्यास, तुम्हाला व्याज आणि दंड दोन्ही आकारले जाऊ शकतात.

तसेच जर तुम्ही २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तुमचा आयटीआर वेळेवर सादर केला नाही, तर तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत उशीरा रिटर्न भरण्याची मुदत आहे. मात्र, तुम्हाला विलंब शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतही तुमचा आयटीआर दाखल केला नाही, तर तुम्ही तुमचा आयटीआर भरू शकणार नाहीत.

१ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले आधारकार्ड असलेल्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. असे न केल्यास पॅन निष्क्रिय होईल. गुंतवणूक आणि डीमॅट व्यवहारांसह बँक सेवांवरही परिणाम होईल.

याशिवाय, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये, रेशन कार्ड ई-केवायसीसाठी डिसेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास जानेवारी २०२६ पासून सरकारी रेशन मिळणे बंद होवू शकते.

घर बांधणीसाठी अडीचलाख रुपयांपर्यंत मदत देणाऱ्या पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार त्यांचे आधार, उत्पन्न प्रमाणपत्र आणि निवास प्रमाणपत्र वापरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रेतील कनेक्टिव्हिटी वाढणार! 'तो' स्कायवॉक लवकरच सुरू होणार; पादचाऱ्यांना मोठा दिलासा

सेटवर कसे वागत होते अजय आणि काजोल? पूर्णिमा तळवलकर यांनी सांगितला अनुभव; म्हणाल्या, ओळख असेल तरच...

Google Trends: 2025 मध्ये भारतीयांनी '5201314' हा कोड गुगलवर का शोधला? वर्षाच्या टॉप-5 कीवर्डमध्ये झाला समावेश; काय आहे रहस्य?

Accident News: भयंकर! भरधाव वेगाने येणाऱ्या कारने काही जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, काय घडलं?

Latest Marathi News Update : कोल्हापूरच्या पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयावरून वाद

SCROLL FOR NEXT