Teacher Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment : डीएड्, बीएड्धारकांसाठी महत्वाची बातमी! शिक्षक भरतीबाबत शासनानं घेतला मोठा निर्णय

शासनाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचे जाहीर केले.

राजापूर : गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकभरती न झाल्याने अनेक डीएड्, बीएड् (D.Ed., B.Ed) झालेले विद्यार्थी शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिले आहेत. रिक्त असलेल्या शिक्षक जागांवर (Teacher Recruitment) मानधन तत्त्वावर नियुक्त्या झाल्याने त्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

मात्र, शासनाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांचा शिक्षक होण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्याला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून (Primary Teachers Association) विरोध केला जात आहे.

रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांना नियुक्त्या देण्याची मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेकडून या विषयी शासन व प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे.

वेळप्रसंगी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो लढा पुकारून बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.

त्याबाबतची माहिती शिक्षक संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, रत्नागिरी जिल्हानेते प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर, कोकण विभाग अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी दिली. शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचे जाहीर केले. त्याचा फटका बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांना बसणार आहे. त्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक पुरोगामी संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

डीएड्, बीएड्धारकांची नियुक्ती करावी

सेवानिवृत्त कर्मचारी हा वयोमानानुसार निवृत्त होत असून, वयोमान झाल्यामुळे कार्य करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये नसते तर, काही कर्मचारी विविध वैद्यकीय कारणांस्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असतात. निवृत्तीच्या काळात त्यांना शासन योग्य ते निवृत्तीवेतन मिळते.

त्याच्याऐवजी जे सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती मिळाल्यास ते या कामाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे रिक्त जागांवर डीएड्, बीएड्धारकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT