SSC_CGL 
एज्युकेशन जॉब्स

SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती

सकाळ डिजिटल टीम

SSC CGL 2020 : नवी दिल्ली : कर्मचारी निर्वाचन आयोग (SSC)ने कंबाइंड ग्रेजुएट लेवल (CGL) परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा २५ मे ते ७ जून २०२१ या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २९ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या तारखेनंतर अर्ज करता येणार नाहीत. 

ही परीक्षा चार टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या दोन टप्प्यांत संगणक आधारित परीक्षा होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून चौथ्या म्हणजे अंतिम टप्प्यातील परीक्षा ही कॉम्प्युटर प्रविणता टेस्ट म्हणजे डाटा एंट्री स्किल टेस्ट असणार आहे. 

या भरती प्रक्रियेद्वारे ३२ पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, सब-इंस्पेक्टर, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, टॅक्स असिस्टंट, अपर डिविजन क्लर्क या पदांचा समावेश आहे. १८ ते ३२ वर्षे वय असलेली कोणतीही व्यक्ती या पदांसाठी अर्ज करू शकते. पदांनुसार पे-स्केल वेगवेगळे असणार आहे. 

शैक्षणिक पात्रता -
असिस्टंट अकाउंटिंग ऑफिसर/असिस्टंट ऑडिट ऑफिसर या पदांसाठी कोणतीही पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतो. ज्या उमेदवारांनी स्पेशलायजेशन म्हणजे विशिष्ट पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे, जसे की चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, मास्टर्स इन कॉमर्स/बिजनेस स्टडीज, एमबीए (फाइनान्स) किंवा मास्टर्स इन बिजनेस (इकॉनॉमिक्स) त्यांना प्राधान्य दिले जाईल. 

ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदासाठी कोणतीही पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. या पदवीसाठी बारावी (एचएससी) स्तरावर किमान 60 टक्के किंवा स्टॅटिस्टिक्स विषयात पदवी असणे आवश्यक आहे. इतर पदांसाठी कोणतीही पदवी प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षेसाठी शुल्क - १०० रुपये

महत्त्वाच्या तारखा -
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात - 29 डिसेंबर 2020
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 जानेवारी 2021
- ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख - 2 फेब्रुवारी 2021 
- ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम तारीख - 4 फेब्रुवारी,
2021 
- चलनद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 6 फेब्रुवारी,
2021 
- टप्पा १- संगणक आधारित परीक्षा होण्याच्या तारखा - 29 मे 2021 ते 7 जून 2021

- SSCच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- SSC-CGL 2020 अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT