UPSC Commission
UPSC Commission  sakal media
एज्युकेशन जॉब्स

UPSC : नागरी सेवा परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकता. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२ ची तयारी करीत असलेले उमेदवार वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. नागरी सेवा परीक्षेच्या ऑनलाइन अर्जाला बुधवारपासून (ता. २) सुरुवात झाली आहे. उमेदवारांना २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. UPSC मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ज्या तरुणांना आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस व्हायचे आहे ते www.upsc.gov.in किंवा www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) याचबरोबर सर्व भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाईल. भारतीय वनसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत बसण्यासाठी, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षा सामायिक असतील. नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून २०२२ रोजी होणार आहे.

परीक्षेच्या 2022 च्या महत्त्वाच्या तारखा

  • UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ अधिसूचना प्रकाशन तारीख - २ फेब्रुवारी २०२२

  • UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या नोंदणीची सुरुवात तारीख - २ फेब्रुवारी २०२२

  • UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ नोंदणीची अंतिम तारीख - २२ फेब्रुवारी २०२२

  • UPSC प्राथमिक परीक्षेची तारीख - ५ जून २०२२

  • UPSC प्राथमिक प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - मे २०२२

नोंदणी कशी कराल

  • उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या

  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ लिंकवर क्लिक करा

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर सूचना वाचा

  • अधिसूचना वाचल्यानंतर नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करा

  • ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक माहिती प्रविष्ट करा

  • तपशील नीट वाचा आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा

  • आता सबमिट बटणावर क्लिक करा.

  • अर्ज फी भरा

  • अर्ज फी भरल्यानंतर अर्ज स्क्रीनवर प्रदर्शित होईल

  • आता फॉर्म डाउनलोड करून घ्या

  • अर्जाची प्रिंट आउट काढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT