Food esakal
फूड

Food Tips : या गोष्टी दह्यासोबत खाल्यास आरोग्यास धोका

दही आरोग्यास चांगले असले तरी काही गोष्टी खाल्याने मात्र आरोग्यास धोका निर्माण होतो. यामुळा पोट खराब होऊ शकते किंवा ॲलर्जी होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

ऋतू कोणताही असो पण जेवताना एक कप दही मिळाले की, जेवणाची लज्जत वाढते. व्हीटॅमिन बी २, व्हीटॅमिन बी १२, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम अशा गुणधर्मांनी परीपूर्ण दही आरोग्य व त्वचेसाठी प्रभावी आहे. प्रोबोयोटिकयुक्त दही असे तर आरोग्यदायी असले तरी दह्यासोबत किंवा दही खाल्याबरोबर काही पदार्थ खाल्यास त्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. अशा वेळी अपल्याला थोडे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

चला जाणून घेऊया ते पदार्थ कोणते

दही खाल्यावर लगेच खाऊ नयेत असे पदार्थ

मासे

आयुर्वेदानुसार अत्याधिक प्रोटीन असणारे पदार्थ एकाच वेळी खाऊ नये. दही आणि मासे दोन्हीतही भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने हे एकत्र खाल्याने त्वचा व अपचनाची समस्या होऊ शकतात.

दूध

दूध आणि दह्याचे नाव सोबत घेतले जाते पण सोबत खाऊ शकत नाही. दही खाल्याबरोबर दूध पिल्यास ॲसिडिटी, मळमळणे, छातीत जळजळणे, पोट फुगणे व लूज मोशन असे त्रास होऊ शकतात. शिवाय दूध व दह्यात फॅट्स भरपूर असल्यानेही ते एकत्र खाऊ नये.

आंबा

दह्यावर लगेच आंबा खाल्यावर शरीरात टॉक्सीन्स होऊ शकतात. या फूड कॉम्बिनेशनने ॲलर्जी होऊ शकते.

कांदा

जेवताना दही व कांदा घेणे किंवा कांद्यात दही टाकून कोशिंबिर, रायता बनवे चुकिची निवड ठरू शकते. दही थंड तर कांदा गरम गुणधर्माचा असल्याने हे एकत्र खाणे चुकीचे आहे. यामुळे त्वचेची ॲलर्जी, रिॲक्शन होऊ शकते.

तळलेले पदार्थ

दही खाल्यावर तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणेच योग्य ठरते. यामुळे पचनक्रिया मंदावते व पोटात गडबड होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT