Chocolate Day 2024 esakal
फूड

Chocolate Day 2024 : होम मेड रेसिपीनेच चॉकलेट डे बनवा गोड, रेसिपी आहे सोपी!

चॉकलेटचे आपल्या जिवनातील महत्त्व दृढ करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

Pooja Karande-Kadam

Chocolate Day 2024 : कोणताही शुभ प्रसंग असो आपल्याकडे तो तोंड गोड करून साजरा केला जातो. दिवाळी, वाढदिवस, रिटर्न गिफ्ट म्हणून सध्या चॉकलेटचे बॉक्स दिले जातात. लहान मुलं, कुटुंबातील सगळ्यांचेच तोंड गोड करण्याचा  हा बेस्ट फॉर्म्युला आहे.

आज आंतरराष्ट्रीय चॉकलेट डे आहे. चॉकलेटचे आपल्या जिवनातील महत्त्व दृढ करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आजच्याच या दिवशी तुम्हालाही चॉकलेट खाऊन सेलिब्रेशन करायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण घरीच कोको पावडर पासून चॉकलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत.

चॉकलेटसाठी लागणारे साहित्य :

– एक वाटी पिठी साखर

– नारळ तेल किंवा कोकाआ बटर पाऊण कप

– 1 चमचे व्हॅनिला इसेन्स

– पाव कप दुधाची पावडर

– पाऊण कप कोको पावडर

होममेड चॉकलेट कृती :

सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा, मग त्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घाला. नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची पावडर घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

जेव्हा ते गुळगुळीत आणि एकधारी दिसू लागतील, तेव्हा आपल्या आवडत्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण भरा. यासाठी बर्फाचा साचा देखील वापरु शकता. चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड हलक्या हाताने हलवा. यानंतर, तो दोन तास फ्रिजमध्ये ठेवा.

सेट झाल्यानंतर प्लेटमध्ये एक एक करून चॉकलेट बाहेर काढा. व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी, तळापासून हलका दाब देऊन चॉकलेट पुढे ढकला. नंतर त्यावर थोडाशी पिठी साखर भूरभुरा. झाले तुमचे होममेड चॉकलेट तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT