फूड

Healthy Food : तांदुळ, रव्याची इडली खाऊन कंटाळलात? आता बनवा गाजराची पौष्टीक इडली!

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही तांदुळ, रवा आणि डायटसाठी ओट्सची इडली खाल्ली असेल. पण तुम्ही कधी गाजराची इडली ट्राय केली आहे का? नाही ना. गाजराचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामूळे त्यापासून बनलेली इडली हेल्दी आणि टेस्टी बनते. शिवाय ती बनवायलाही सोपी आहे. त्यामूळे सध्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये इडलीचा हा पदार्थ प्रसिद्ध होत आहे.

हिवाळ्यात गाजरापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यातही गाजराचा हलवा हा कॉमन पदार्थ प्रत्येकाच्या घरात बनतो. हिवाळ्यात तर प्रत्येक भाजीत, पराठ्यात गाजराचे अस्तित्व अगदी उठून दिसते. आज आपण गाजराची इडली कशी बनवली जाते ते पाहुयात. जी मुलेही हट्टाने टिफिनमध्ये द्यायला सांगतील.

साहित्य

२ हिरव्या मिरच्या,२ इंच आले,२ मोठे गाजर – प्युरीसाठी,१ गाजर – किसलेले,अर्धा चमचा मीठ,१ कप रवा,१ कप दही,१ पॅकेट इनो,२ चमचे तेल,१/२ टीस्पून मोहरी,८-१० कढीपत्ता

कृती

इडली बनवण्यासाठी आधी गाजर स्वच्छ धुवून, सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत. २ मिरच्या आणि आल्याचेही बारीक तुकडे करावेत. आता अर्धा कप पाणी घालून या वस्तू एकत्र करून त्याची प्युरी बनवून घ्यावी.

प्युरी तयार केल्यानंतर आता एक गाजर बारीक किसून घ्या. गाजराची तयारी पूर्ण झाल्यावर रव्याचे पीठ तयार करावे. इडली पिठासाठी एका बाऊलमध्ये १ कप रवा, अर्धा कप दही आणि तयार केलेली गाजर प्युरी, किसलेले गाजर आणि १ कप पाणी मिक्स करावे. आता त्यात अर्धा चमचा मीठ घाला. आता हे मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा.

आता येणार आहे एक ट्विस्ट, शक्यतो आपण पिठ भिजवतो आणि केवळ मीठ घालून ते इडली पात्रात भरतो. इथे तसे न करता. फोडणीच्या भांड्यात २ चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मग त्यात १ चिमूट हिंग घालून काही सेकंद परतून घ्या आणि ८-१० कढीपत्ता घालून गॅस बंद करा.

आता तयार केलेली फोडणी आपल्या इडलीच्या तयार पिठात घाला. आता त्यातच १ पॅकेट इनो घालून मिश्रण चांगले एकजीव करा. आता गॅसवर इडली पात्रात पाणी उकळत ठेवावे. इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात थोडे थोडे पीठ घालावे. ७ मिनीटांनी गॅस बंद करावा. भांडे लगेच न उघडता वाफ जाऊ द्यावी.

या इडलीसोबत शेगदाण्याची किंवा खोबऱ्याची ओली चटणी बनवावी. ज्यामूळे इडली अधिकच चवदार बनते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT