Navratri Recipe esakal
फूड

Navratri Recipe : बनवा टेस्टी आणि हेल्दी फास्टिंग स्नॅक्स

बहुतेक लोक नवरात्रीच्या दरम्यान उपवास करतात. अशावेळी उपवासात तुम्ही या टेस्टी आणि हेल्दी उपवासाच्या स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकता. पाहा रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Fasting Snacks Recipe : नवरात्रीचे नऊ दिवस अनेक लोक उपवास करत असतात. काही लोक एकवेळ जेवतात. काही न दिवसांचा उपवास करतात तर काही लोक कांदा, लसूण, आले, लिंबू आणि टोमॅटोपासून बनवलेले अन्न पूर्णपणे सोडून देतात.

या काळात उपवास करणारे लोक स्वतःसाठी काही फराळाचे पदार्थ तयार करू शकतात. या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी खूप लवकर तयार होतात. जाणून घ्या रेसिपी.

१) स्ट्रॉबेरी नारळाचे लाडू

नवरात्रीच्या उपवासात खूप भूक लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही स्नॅक्स बनवून तयार करू शकता.

साहित्य

  • ५ टेबलस्पून स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड सिरप

  • १ टेबलस्पून तूप

  • १ नारळ (ताजे किसलेले)

  • ३ टेबलस्पून पाणी

  • ४ टेबलस्पून सुके खोबरे (कोटिंगसाठी)

कृती

हे बनवण्यासाठी कढईत तूप गरम करा. ताजे किसलेले खोबरे घाला. नंतर स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड सिरप आणि पाणी घाला. आता कडा सोडेपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर लाडू बनवा आणि कोरड्या खोबऱ्याने कोट करा.

२) मँगो आईस्क्रीम

हे बनवायला खूप कमी वेळ लागेल आणि त्याची चवही खायला खूप छान लागेल.

साहित्य

  • १ कप नारळाचे दूध

  • १ कप आंब्याचे चौकोनी तुकडे (सेमी फ्रोजन)

  • किंवा मँगो पल्प वापरावा

  • १ चमचा मध

कृती

मिक्सरमध्ये दूध आणि आंब्याचे चौकोनी तुकडे किंवा मँगो पल्प गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. आता ते फ्रीझर फ्रेंडली बाऊलमध्ये घ्या आणि मिश्रण फ्रीज करा. एकदा ते पूर्णपणे सेट झाले की, हे मिश्रण मिक्स करा आणि ही प्रक्रिया ३ वेळा पुन्हा करा. सॉसरमध्ये घाला आणि क्रीम रात्रभर फ्रीज करा. दुसऱ्या दिवशी त्याचा आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT