Health Benefits Of Onion
Health Benefits Of Onion 
फूड

उन्हाळ्यात कांदा खाल्याने होतात ५ फायदे

सकाळ डिजिटल टीम

Health Benefits Of Onion: कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. आपल्याकडे रोजच्या जेवणात कांदा कुठल्याना कुठल्या पदार्थात वापरला जातो. सलाडमध्येही कांदा आवडीने खाल्ला जातो. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अतिशय चांगले मानले जाते. कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. तसेच उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. त्यामुळे कांदे खाण्याचे चांगले फायदे आहेत.

होतात ५ फायदे

१) थंडपणा- कांद्याचा प्रभाव थंड असतो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो.

२) उष्माघातापासून संरक्षण- उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते.

३) पचन- उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो. तुम्ही सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.

४) प्रतिकारशक्ती - कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करा.

५) मधुमेह- मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. पांढऱ्या कांद्यात आढळणारी क्वेर्सिटीन आणि सल्फर सारखी काही संयुगे मधुमेहविरोधी असतात. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT