Vrat Recipes : 
फूड

Shravan Somavar Recipes : खास उपवासाची पौष्टीक कचोरी, कढी आणि मँगो पुदीना

श्रावणी सोमवारच्या व्रतासाठी चवीष्ट व पौष्टीक फराळ

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिना सगळ्यात पवित्र महिना समजला जातो. या काळात असे मानले जाते की, सृष्टीचे पालन कर्ता भगवान विष्णू चार महिने योग निद्रेत जातात. त्यामुळे त्यांची जागा भगवान शिव घेत ते पालनकर्ता होतात. त्यामुळे या काळात शिव पूजा आणि व्रताचे महात्म्य वाढलेले असते. श्रावण महिन्यात काही लोक पूर्ण महिनाभर उपवास ठेवतात तर काही श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उपवास करतात. म्हणूच या काळात उपवास करताना फराळ हा चविष्ट असण्याबरोबरच पौष्टीक असणेही आवश्यक आहे.

येथे आम्ही अशाच काही झटपट होणाऱ्या पदार्थांविषयी सांगणार आहोत.

मँगो पुदिना

नुकताच आंब्याचा सिजन येऊन गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी किंवा बाजारातही फ्रेश पल्प असतात. पुदिना पोटाला ताजेतवाने ठेवते. त्यामुळे जर तुम्ही उपवासाच्या फराळात मँगो-मिंट लस्सी घेतली तर चव आणि एनर्जी कायम राहते. यामुळे थकवा जाणवत नाही. शरीर हायड्रेट राहते. व याला बनवनेही सोपे आहे.

साहित्य

अर्धा किलो पिकलेला आंबा / पल्प

ताजा पुदिना

काजू, किशमिश ५० ग्रॅम (तुकडे)

साखर आवश्यकतेनुसार

दूध अर्धा लीटर (उकळून गार केलेले)

कृतीः आंबे धुवून त्याचा गर मिक्सरमध्ये काढून घ्या. किंवा तयार पल्प घ्या. दूध, पुदिना, साखर व आंब्याचे गर एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. ग्लासमध्ये काढून त्यावर ड्रायफ्रूट टाकावे.

उपवासाची कढी

ही कढी चविष्ट असण्याबरोबरच पचनक्रीया सुधरवते. हे फार सहज, झटपट बनवले जाऊ शकते. उपवासाच्या थालीपीठासोबत हे खाता येऊ शकते.

साहित्यः

ताजे दही २५० ग्रॅम

आंबट दही २५० ग्रॅम

सिंगाड्याचे पिठ २५०

खिसलेले आले

लाल मिरची पूड

कोथिंबीर बारीक चिरलेली

बटाटे अर्धा किलो

तेल

सेंधे मिठ

कृतीः भजी बनवण्यासाठीः एका मोठ्या बाउलमध्ये तीन मोठे चमचे सिंगाड्याचे पीठ, चिरलेली हिरवी मिरची, लहान अर्धा चमचा खिसलेले आले, चवीप्रमाणे सेंधे मिठ, एक चमचा कोथिंबिर, दोन मोठे चमचे दही हे सर्व पाणी टाकून भज्यांसाठी योग्यप्रमाणात कालवावे. नंतर हे भजे डार्क ब्राऊन रंगात तळून घ्यावे.

कढी बनवण्यासाठीः एका बाऊलमध्ये एक कप आंबट दही घ्यावे. यात दोन चमचे सिंगाड्याचे पिठ टाकून व्यवस्थित फेटून घ्यावे. वरून दिड कप पाणी घालून एकसारखे करून घ्यावे. मध्यम आचेवर कढई तापवून त्यात एक चमचा जीरे, चिमुटभर सेंधे मिठ, दोन खडी लाल मिरची, अर्धा चमचा खिसलेले आले परतवून त्यात कढीचा घोल टाकावा. याला व्यवस्थित उकळून घ्यावे. नंतर त्यात भजी टाकावी. १५-२० मिनीटे शिजवले की उपवासाची कढी तयार.

उपवासाची कचोरीः

उपवासाला थोडे चटपटीत पदार्थ मिळाले तर तोंडाला चव येते. कचोरी असा पदार्थ आहे जो सगळ्यांना आवडतो. कचोरी आणि कढीचे कॉम्बिनेशन विशेष पसंत केले जाते.

साहित्य

उकडलेले बटाटे अर्धा किलो

नारळ १

दही ५०० ग्रॅम

काळी मीरे पूड

गरम मसाला

शेंगादाणे

सिंगाड्याचे पिठ

साखर

लिंबू १

रिफाइंड तेल

कृतीः एका बाउलमध्ये सिंगाड्याचे पिठ घेउन त्यात चवीनुसार सेंधे मिठ, दोन लहान चमचे तेल घालून व्यवस्थित मळून घ्यावे. उकडून सोललेले बटाटे मॅश करून घ्यावे. त्यात चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरे पूड, आमचूर, खिसलेले आले, चवीनुसार सेंधे सिठ हे सर्व मिश्रण व्यवस्थीत एकत्र करून घ्यावे. कचोरी भरण्यासाठी मिश्रण तयार आहे. पुरण भरल्याप्रमाणे सिंगाड्याच्या पिठात हे मिश्रण भरून घ्यावे व त्याला हलक्या हाताने लाटावे. नंतर तेलात तळून घ्यावे.

या चविष्ट कचोरीसोबत कढी चाखावी व गोड म्हणून तुमची पुदिना लस्सी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT