Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 
ganesh article

Ganeshotsav 2022 : मानवी शीर असलेले बाप्पाचे जगातील एकमेव मंदिर; श्रीरामांनीही केली होती पूजा

सकाळ डिजिटल टीम

जगभरात गणेशाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराला अनेक पौराणिक कथा जोडल्या गेल्या आहेत. गणपती बाप्पाचे नाव घेतले तरी 'वक्रतुंड विघ्नविनाश' असेच आपण म्हणतो. मात्र, गणपतीला गजाचे मुख लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी शीर असलेल्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती असलेले मंदिर भारतात आहे. नेमके कुठे आहे ते मंदिर याविषयी जाणून घेऊया... (Ganesh Article)

कसे आहे गणेशाचे स्वरूप?

तामिळनाडूमधील तिरुवरुर शहरातील तिलतर्पणपुरी तीर्थाजवळच हे विशेष गणेशमंदिर आहे. पिता महादेवांनी गणेशाचे मानवी शीर धडापासून वेगळे करण्यापूर्वीचे हे गणेश रूप आहे. या गणेशाला आद्य गणेशही म्हणतात. गणेशाच्या या मूर्तीला चार हात असून चेहरा कार्तिकस्वामी यांच्यासारखा आहे. आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेल्या स्वरूपात या गणेशाचे स्वरूप आहे. या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत, अशी कथा आहे.

या मंदिरात श्रीरामचंद्रांचा सहवास

या मंदिराला श्री रामचंद्रांचा सहवास लाभला असल्याची आख्यायिका आहे. कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे येवू लागले. पुन्हा-पुन्हा घडू लागले. शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेवांची साधना केली.

श्रीरामांच्या कठोर साधनेवर प्रसन्न होत महादेव तेथे प्रकट झाले. त्यांनी मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे, असे श्रीरामांना सांगितले. त्यानुसार, तत्कालीन मंथरावन येथे जाऊन श्रीरामांनी पिंडदान केले. श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात.

तिलतर्पणपुरीचा अर्थ

हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. या कथेमुळे तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करण्याची प्रथा आहे. गणेशाच्या मंदिरात धार्मिक विधी केले जातात तर बाजूच्या नदीत श्राद्धाचे विधी पार पडतात. तिलतर्पण या शब्दाचा अर्थ आहे समर्पण म्हणजे पितरांना समर्पित होणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT