१ जानेवारीला जगभरातील सर्वच देशांनी २०२१ या नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोनामुळे अनेक ठिकाणी स्वागतावर निर्बंध लादण्यात आले होते. पण तरीही आशावादी राहत जगभरात नववर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं, पण तरीही एक देश याला अपवाद ठरला आहे. कारण जगात एक असा देश आहे, जिथं २०२१ नाही तर २०१४ वर्ष चालू आहे.
हा कोणता देश आहे?
आफ्रिका खंडात असणाऱ्या या देशाचं नाव आहे इथिओपिया. या देशाचं कॅलेंडर जगातील इतर देशांच्या ७ वर्षे ३ महिने मागे आहे. हा देश इतर देशांपेक्षा बर्याच बाबतीत पूर्णपणे भिन्न आहे, जसे की आपल्याकडे एका वर्षामध्ये १२ महिने असतात, परंतु त्यांच्याकडे एका वर्षात १३ महिने असतात.
८५ लाखाहून अधिक लोकसंख्या असणारा देश
इथिओपियाची लोकसंख्या ८५ लाखापेक्षा जास्त असून आफ्रिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. आपले स्वतंत्र कॅलेंडर असणारा हा देश इतरांच्या तुलनेत जवळपास साडे सात वर्ष पाठीमागे आहे. आपल्या हटक्या वैशिष्ट्यामुळे इथिओपियाचे कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच तेथील लोक नवीन वर्ष १ जानेवारीऐवजी ११ सप्टेंबर रोजी साजरा करतात.
ग्रेगोरियन कॅलेंडर कधीपासून सुरू झालं?
इथिओपियाचे हे विचित्र ग्रेगोरियन कॅलेंडर इ.स.१५८२ मध्ये सुरू झाले. यापूर्वी येथे जुलूस कॅलेंडरचा वापर केला जात होता. कॅथलिक चर्चवर विश्वास नसलेल्या या देशातील लोकांनी नवीन कॅलेंडरला आपले अधिकृत कॅलेंडर म्हणून मान्यता दिली. तेव्हा अनेक देशांनी याचा विरोध केला होता. भारतीयांनीही इथिओपियाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला होता.
ऑर्थोडॉक्स चर्चला मानतात इथोओपियन नागरिक
इथिओपियावर रोमन चर्चची छाप जबरदस्त होती. याचा अर्थ असा की, त्यांचे स्वत:चे ऑर्थोडॉक्स चर्च आहे. इथिओपिया हा असा देश आहे, जिथे येशूचा जन्म हा इसवी सन पूर्वमध्ये होते, तर संपूर्ण जगाच्या कॅलेंडरनुसार येशूचा जन्म इसवी सनमध्ये होतो. हेच कारण आहे की ज्यामुळे इथिओपिया अजूनही २०१४मध्ये अडकला आहे. आणि इतर देशांनी २०२१चं स्वागत केलं आहे.
शेवटचा महिना पागुमे
कॅलेंडरनुसार डिसेंबर हा जसा आपला शेवटचा महिना आहे, तसा इथिओपियन लोकांचा शेवटचा महिना आहे पगुमे. ज्यामध्ये ५ किंवा ६ दिवस असतात. हा महिना वर्षाच्या त्या दिवसांची कमी भरून काढतो, जे काही कारणास्तव वर्षांमध्ये गणले जात नाहीत.
पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी इथिओपियन नागरिकांनी घेतात. कारण इथिओपियामध्ये पर्यटनासाठी जाणऱ्या पर्यटकांना या विचित्र कॅलेंडरमुळे हॉटेल बुकिंग आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते हे त्यांनी जाणलं आहे.
मनसोक्त फिरा
इथिओपियाचं वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या जागतिक वारसा स्थळांची संख्या या देशात जास्त आहे. जगातील सर्वात खोल आणि सर्वात लांब गुहा, जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असलेला हा देश असल्याने जगभरातून पर्यटक येथे येतात. ११ सप्टेंबर रोजी साजरे होणारे नवीन वर्ष हे देखील इथिओपियाचे वैशिष्ट्य आहे.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.