ग्लोबल

America : मांजराच्या पिलाला झाला रेबिज, अमेरिकेत लॉकडाऊनजन्य परिस्थिती, डॉक्टरही चक्रावले

Pooja Karande-Kadam

America :

अमेरिकेतील नेब्रास्का येथे नुकत्याच एका भटक्या मांजराच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, स्टॅनली या जेमतेम दोन पौंड वजन असलेल्या मांजरीचे पिल्लाला रेबिज झाला होता.

या मांजराला काही आजार नव्हता. पण अचानक त्याने खाणे बंद केल्याने त्याला फेफरे येऊ लागले. डॉक्टरांकडे नेण्यात आले,डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण त्याला रेबीज झाल्याचे सांगितले.

एखादा प्राणी एखाद्या व्यक्तीला चावतो तेव्हा रेबीज नावाचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो, जो प्राणघातक असतो. इतकेच नाही, पण त्याचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होतो. अलीकडेच अमेरिकेतील नेब्रास्का येथे एका आजारी मांजरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

या मांजरीला रेबीज झाला होता. हे साधे वाटत असले तरी तिच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या मांजरीने मरण्यापूर्वी सुमारे 10 जणांवर हल्ला करून चावा घेतला होता. या घटनेनंतर रेबीजची मोठी भीती निर्माण झाली आहे.  

ही मांजर अमेरिकेतील नेब्रास्का येथील मॅडलिन येथील एका जोडप्याने दत्तक घेतली होती. मांजरीने या जोडप्यावर आधीच हल्ला केला होता. डॉक्टरांनी तपास केला. स्टॅनली हे मांजराच्या पिलाला किरकोळ आजारामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या मांजराचा मृत्यू रेबिजमुळे झाला आहे, हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला.

डॉक्टरांकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टॅनलीचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत तिने 10 जणांना चावा घेतला होता. अशा परिस्थितीत, त्याने 10 पैकी कोणाला संसर्ग पसरवला आहे की नाही यासाठी तपासण्या केल्या जात आहेत. तसेच, योग्य ती काळजीही घेतली जात आहे. 



1,000 रॅकूनचे लसीकरण

मांजरीच्या मृत्यूनंतर रेबीजचा एक प्रकार उघड झाला. जो सामान्यतः अॅपलाचिया प्रदेशाच्या पूर्वेकडील रॅकूनमध्ये आढळतो. त्यानंतर लवकरच, डग्लस काउंटीच्या आरोग्य अधिकार्‍यांनी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात 1,000 रॅकूनचे लसीकरण करण्यास सुरुवात केली.

लक्षणे सुरू होण्यापूर्वी उपचार न केल्यास रेबीजमध्ये व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित असतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

सीडीसीचा अंदाज आहे की, आता या भागात रेबीजचा रॅकून प्रकार पसरण्यापासून रोखणे आवश्यक आहे. कारण हा विषाणू वेगाने पसरला तर त्याचे परिणाम भयंकर होतील. ते दरवर्षी 24 मैल रेडियसपर्यंत पसरू शकते.

आरोग्य अधिकार्‍यांनी स्टॅनलीने हल्ला केलेल्या सर्व दहा लोकांचा शक्य तितक्या लवकर शोध घेतला आहे. आणि त्यांना रेबीज लसीचे चार डोस आणि व्हायरस घालवण्यासाठी मानवी रेबीज इम्यून ग्लोब्युलिनचे लसीकरण केले जाऊ शकतो.

मांजरीचा मृत्यू झाल्यापासून, राज्य आणि फेडरल अधिकार्‍यांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसरात प्राण्यांना पकडण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी दहा दिवस काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT