Arthur O Urso and his wives
Arthur O Urso and his wives सकाळ
ग्लोबल

आठ पत्नींसोबत बाळाची प्लॅनिंग करतोय हा मॉडेल; कारण ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

ब्राझिलचा मॉडल आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) नेहमीच वादात असतो. आता तो एका नवीन बाबींमुळे चर्चेत आलाय. 9 मुलींसोबत लग्न केलेल्या आर्थरला आता मूल पाहीजे आहे यामागचे कारणही एकूण तुम्हाला धक्का बसेल. कारण त्याच्या नऊ पत्नींपैकी एकाने त्याला घटस्फोट दिलाय आणि आता नव्या मुलाच्या माध्यमातून त्याला कुटुंबातील तीची कमतरता भरून काढायची आहे.

हे बाळ त्याच्या कोणत्या बायकोच्या पोटी जन्माला येणार यांसंदर्भात त्याला काहीही माहिती नाही मात्र 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' ही थीम असणार, असं तो म्हणाला.

आर्थरची पहिली पत्नी लुआना काज़ाकी आहे जी इतर सात बायकांसोबत राहते. काही दिवसांपूर्वी आर्थरने सांगितले होते की त्याने सेक्स रोस्टर तयार केले आहे जेणेकरून तो आपल्या प्रत्येक पत्नीला आनंदी ठेवू शकेल. मात्र हा प्लॅन अयशस्वी झाल्याचेही त्याने नंतर सांगितले. त्याला रोस्टरमुळे इच्छा नसतानासुद्धा पत्नीसोबत रहावे लागत होते.

आर्थर म्हणतो, "तो कोणाबरोबर मुलाची योजना करेल हे त्याला माहित नाही. मात्र फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ही थीम असणार. पुढे तो म्हणतो, विशेष म्हणजे ज्या पत्नीला माझे मूल होईल, ते मुल खूप प्रेमाने वाढेल. त्याला इतर सात आईंचेही प्रेम मिळणार. माझ्याकडे अशी कोणतीही आवडती पत्नी नाही जिच्याशी मी मुले जन्माला घालण्याची प्लॅन करु. मला हे नैसर्गिकरित्या होऊ द्यायचं आहे. माझ्या अनेक बायका मूल करण्यास फारश्या उत्सुक नाहीत पण सर्वजण मुलाच्या स्वागतासाठी उत्साहीत आहे."

आर्थर पुढे म्हणाला, मला वाटतं पहिलं मूल झाल्यानंतर इतर बायकांनाही असाच अनुभव घ्यायला आवडेल. पण सध्या तरी प्रथम येणाऱ्या मुलास प्राधान्य दिले जाणार."

आर्थर बहुविवाहाचा समर्थक आहे आणि तो त्याचे नवनवीन अनुभव इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याचे जवळपास एक लाख फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT