Khalistan Commando Force chief Panjwar shot dead in Lahore
Khalistan Commando Force chief Panjwar shot dead in Lahore  
ग्लोबल

KCF : खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची पाकिस्तानमध्ये हत्या! सोसायटीमध्ये घुसून झाडल्या गोळ्या

Sandip Kapde

लाहोर : खलिस्तान कमांडो फोर्स (केसीएफ) या नक्षलवादी संघटनेचा प्रमुख परमजितसिंग पंजवाड याचा शनिवारी खून करण्यात आला. जोहर भागातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये घुसून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. यात पंजवाडचा जागीच मृत्यू झाला.

परमजितसिंह पंजवाड हा १९९० पासून मलिक सरदारसिंग या नावाने पाकिस्तानच्या आश्रयाने राहत होता. आज सकाळी सहा वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते फरारी झाले. पंजवाड हा पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील पंजवाड गावातील होता.

केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२०मध्ये जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव आठव्या क्रमांकावर होते. यादीत त्याच्याशिवाय बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय)चा प्रमुख वधवासिंग बब्बर याचेही नाव होते. तो तरणतारणमधील दासूवाल गावत राहणारा आहे.

अमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी

परमजितसिंग पंचवाड हा पाकिस्तानमधून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र पुरविण्याचे काम करीत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्याने खलिस्तान कमांडो फोर्स कार्यरत ठेवली होती. पंजाबमध्ये नक्षलवाद फोफावलेला असताना १९८६ मध्ये पंचवाडने चुलत भाऊ लाभसिंग याच्यासह ‘खलिस्तान कमांडो फोर्स’मध्ये सहभागी झाला होता.

यापूर्वी तो पंजाबमधील सोहलमध्ये सहकारी बँकेत काम करीत होता. भारतीय सुरक्षा दलांनी लाभसिंगला ठार केल्यानंतर १९९० च्या दशकात पंचवडने ‘केसीएफ’ची सूत्रे हाती घेतली आणि पाकिस्तानात पळून गेला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT