Company Gifted BMW Car to Employees Sakal
ग्लोबल

कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिल्या BMW कार

कंपनीच्या वाढीसाठी दिलेलं योगदान तसेच कोरोना काळात केलेलं उत्कृष्ट काम यामुळे किसफ्लोने आपल्या कर्मचार्‍यांना BMW कार दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेरोजगारी आणि कामाच्या बदल्यात मिळणारं अत्यल्प मानधन ही अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार असते मात्र एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची इमानदारी तसेच कामाप्रति निष्ठा पाहून चक्क BMW कार भेट दिल्या आहेत. जागतिक सॉफ्टवेअर सेवा कंपनी किसफ्लोच्या (Kissflow) CEO ने कंपनीच्या पाच वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना त्यांच्या निष्ठा आणि वचनबद्धतेचा सन्मान म्हणून BMW 530d कार भेट दिल्या आहेत. या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानामुळे तसेच कोविड 19 च्या काळात कंपनीला दिलेली भक्कम साथ यासाठी किसफ्लोने आपल्या पाच कर्मचार्‍यांना ही भेट दिली आहे. (Kissflow company gifted BMW vehicles to its staff, Gift of loyalty)

कंपनीने या कार बक्षिस देण्याची माहिती गुप्त ठेवली होती. कार कर्मचाऱ्यांना देण्याचा सोहळा गुप्त ठेवण्यात आला होता. कार वितरण समारंभाच्या काही तास आधी या कर्मचाऱ्यांना एक महागडी आलिशान कार घेणार असल्याचे सांगण्यात आले. किसफ्लो इंकचे सीईओ सुरेश संबंदम यांनी सांगितले की, कार गिफ्ट मिळवणारे अतिशय नम्र आणि प्रतिभावान आहेत. त्यांना कंपनीत सामील होण्यापूर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

कंपनीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचाही सामना करावा लागला आणि कोविड-19 महामारीच्या काळात काही गुंतवणूकदारांनी कंपनीच्या यशस्वी कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. हा कठीण काळ होता. महामारीच्या काळात, गुंतवणूकदारांना खात्री नव्हती की ही कंपनी टिकेल. आज आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही गुंतवणूकदारांना पैसे परत केले आहेत आणि आता पूर्णपणे खाजगी मालकीची कंपनी बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस...सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT