medicine scam, prime minister, imran khan, pakistan
medicine scam, prime minister, imran khan, pakistan 
ग्लोबल

संकटजन्य परिस्थितीतही पाकमध्ये औषधांचा घोटाळा?

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या परिस्थितीत भारतासह अन्य राष्ट्रांत अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याची योजना आखली जात आहे. मात्र पाकिस्तानात यापेक्षा विपरित काही तरी घडत आहे. जागतिक संकटाच्या काळातही पाकमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना समोर येताना दिसत आहेत. भारतातून आयात करण्यात आलेल्या औषधांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी कथित घोटाळ्याची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. 

पाकमध्ये जीवनावश्यक औषधांच्या नावाखाली व्हिटॅमिन गोळ्या मागवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 5 ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकने भारतासोबतचा व्यापारी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोना विषाणूच्या थैमानानंतर पाक सरकारने भारतातून काही जीवनावश्यक औषधे आयात करण्याची परवानगी दिली होती. पाकिस्तानमध्ये औषध उपलब्ध नसल्यामुळे सरकारने जीवन रक्षक औषधाच्या कच्च्या मालाच्या आयातीला परवानगी देण्यात आली होती. 

मात्र, सरकारने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करुन अनावश्यक औषधे आयात करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानमधील विरोधक करत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी या प्रकरणाचा तपास करावा, असे आदेश काढले आहेत. चौकशी पारदर्शक करावी, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. व्हिटॅमिन आणि आवश्यक औषधांसाठी लागणारा कच्चा माल भारतातून पाकिस्तानमध्ये आयात करण्यात आला होता. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्रानुसार,  राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका परिपत्रकामध्ये भारतातून व्हिटॅमिन आणि कच्चा माल आयात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इम्रान खान यांनी भारतातून आयात करण्यात आलेल्या औषधांची यादी देखील मागितली आहे.  

आरोग्य मंत्रालयाचे सचिव तन्वीर अहम कुरेशी यांची स्वाक्षरी असलेल्या औषधासंदर्भातील दस्ताएवजावर, बीसीजी, पोलिओ, टेटनस. यासस व्हिटॅमिनची औषधांची आयात करण्यात आली आहे. पाकिस्तानी औषध नियामक प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या काळात दावा करण्यात आला होता की, कच्च्या मालाची आयात रोखल्यामुळे कॅन्सरवरील उपचारादरम्यान अडचणी निर्णाण होतील. त्यानंतर सर्व प्रकारची औषधे भारतातून आयात केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

medicine scam, prime minister, imran khan, pakistan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT