ब्रह्मोस मिसाइल सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

Missile Accident: बदल्यासाठी पाकिस्तान तयार होता

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार पाकिस्तानने या घटनेचा बदला म्हणून मिसाईल हल्ला करण्याची योजना आखली होती.

सकाळ डिजिटल टीम

भारताने भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत स्पष्ट केले होते. 9 मार्च रोजी चुकून मिसाईल भारतीय लष्करी तळावरुन पाकिस्तानमध्ये पडले होते. भारताने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. आता ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला की पाकिस्तानने देखील या घटनेचा बदला म्हणून मिसाईल हल्ला करण्याची योजना आखली होती. पण सुरुवातीला तपासात काहीतरी गडबड आढळल्याने पाकिस्तानने ही योजना मागे घेतली.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतीय वायुसेनेने दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असलेल्या पंजाबमधील अंबाला येथून मिसाईल सोडले होते. या मिसाईलमुळे पाकिस्तानमधील एका निवासी इमारतीचे नुकसान झाले तर याशिवाय कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारताने पाकिस्तानला माहिती देण्यासाठी दोन्ही देशांच्या सर्वोच्च लष्करी कमांडरमधील थेट हॉट लाइनचा वापरही केला नाही. त्याऐवजी, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्षेपण टाळण्यासाठी मिसाईल सिस्टम्स बंद केली.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूह कुरैशी यांनी मंगळवारी सांगितले की, जर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या आत लक्ष घातले नसते आणि अपघाताबाबत समान प्रतिक्रिया दिली असती, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर झाले असते.

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध 2019 पासून सर्वात खराब सुरु आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला सुद्धा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT