Peoples Protest In Sri Lanka esakal
ग्लोबल

Sri Lanka|श्रीलंकेत नागरिक आक्रमक, सरकारविरोधात निदर्शने सुरुच

श्रीलंकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने नागरिकांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोत नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे (Gotabaya Rajapakse) यांच्या राजीनाम्यासाठी सरकारविरोधात निदर्शने सुरु केली आहेत. यात तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या देश आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विद्यमान राजपक्षे सरकारविरोधात रोष आहे. सरकार जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत निदर्शन सुरुच राहिल. आम्ही येथे महिने, वर्षे थांबू. हा केवळ एका कुटुंबाचा विषय नाही, तर पूर्ण भ्रष्ट व्यवस्थेचा मुद्दा आहे, असे एका आंदोलकाने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. (Sri Lankan Economic Crisis People Continue Their Protest Against Government)

हा लढा नैसर्गिक आहे. आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संविधानिक प्रक्रियेत उपलब्ध असलेल्या सर्व पद्धतींचा वापर करणार आहोत. मी सर्व जागतिक नेते, संस्थांना आवाहन करतो, की श्रीलंकेला (Sri Lanka) जास्तीत-जास्त मदत करावी, असे श्रीलंकेतील विरोधी पक्षनेते सजिथा प्रेमदासा यांनी सांगितले. आमचे स्वतःचे संविधान आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत.

पाकिस्तानकडे लोकशाही राजकारण चालवण्याची स्वतःची पद्धत आहे. आम्ही कशाचेही पालन करणार नाहीत. मात्र संविधानाचे पालन करणार असा शब्द प्रेमदासा यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT