Shriram Amberla|Hyderabad Couple Esakal
ग्लोबल

Hyderabad Couple: आधी 'गूगल'वरून घेतली आयडिया अन् मग केला गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला; वाचा डोकं सुन्न करणारा प्रकार

Attack On Girlfriend: हल्ल्यापूर्वी अंबरलाने "यूकेमध्ये एखाद्या परदेशी व्यक्तीची हत्या केल्यास काय होईल", "चाकूने एखाद्याला मारणे किती सोपे आहे", आणि "चाकूने एखाद्या व्यक्तीला त्वरित कसे मारायचे" हे ऑनलाइन शोधले होते.

आशुतोष मसगौंडे

२०२२ मध्ये लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये हैदराबादमधील २५ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार करत तिचा गळा कापला होता.

त्याची प्रेयसी असलेल्या, सोना बिजूवर हल्ला करण्यापूर्वी या तरुणाने "चाकूने तात्काळ माणसाला कसे मारायचे" यासाठी ऑनलाइन शोध घेतल्याचे तपास अधिकाऱ्यांनी उघड केले आहे. तरुणाच्या गुगल सर्च हिस्ट्रीवरून ही बाब समोर आली आहे.

श्रीराम अंबरला (Shriram Ambarla) नावाच्या हैदराबादच्या तरुणाने त्याच्या 23 वर्षीय मैत्रिणीला वारंवार धमकी द्यायचा की, जर ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार नसेल तर तो तिला ठार मारेल. यास प्रेयसीने नकार दिला. काही वेळातच अंबरला याने तिच्या गळ्याला पकडून वार केले. बिजू या हल्ल्यातून बचावली पण महिनाभर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होती. (Hyderabad Man Attacked on Girlfriend in UK Restaurant)

या प्रकरणात श्रीराम अंबरला दोषी आढळला. त्यानंतर लंडनमधील न्यायालयाने त्याला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली सुनावली.

सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की, हल्ल्याच्या काही काळापूर्वी अंबरलाने "यूकेमध्ये एखाद्या परदेशी व्यक्तीची हत्या केल्यास काय होईल", "चाकूने एखाद्याला मारणे किती सोपे आहे", आणि "चाकूने एखाद्या व्यक्तीला त्वरित कसे मारायचे" हे ऑनलाइन शोधले होते.

हैदराबादमधील कॉलेजमध्ये बिजू आणि अंबरला यांची पहिल्यांदा भेट झाली होती. 2017 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, गेल्या काही वर्षांमध्ये, त्यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल होता. ज्यामुळे 2019 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. विभक्त होऊनही, अंबरलाने बिजूचे शारीरिक आणि मानसिक शोषण करणे सुरूच ठेवले.

तिच्यावर ताबा मिळवण्यासाठी अंबरला वारंवार बिजूला स्वत:ला इजा करून घेण्याची धमकी देत असे. तो परवाणगीशिवाय तिच्या घरी येऊन तिला ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी आग्रह करायचा.

2022 मध्ये, दोघेही पूर्व लंडन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी यूकेला गेले, परंतु आरोपी श्रीराम अंबरला याचे गैरवर्तन कायम राहिले.

यूकेमध्ये आल्यानंतर बिजू एका रेस्टॉरंटमध्ये काम करू लागला. मात्र, अंबरला तिथेही सतत फोन करू लागला आणि ती त्याची ऑर्डर घरी पोचवेल या आशेने जेवणाच्या ऑर्डर्स देऊ लागला.

मात्र, एके दिवशी अंबरलाने प्रेयसी काम करत असलेल्या रेस्टॉरंटला भेट दिली. इथे बिजूने त्याला इतर ग्राहकांप्रमाणे जेवण दिले.

त्यानंतर काही वेळातच तो तिच्याकडे आला आणि त्याने पुन्हा लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. बिजूने नकार दिल्याने अंबरलाने चाकू काढला आणि तिच्यावर अनेक वार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WCL 2025 स्पर्धेतून युवराज सिंगच्या भारतीय संघाची माघार; पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलवर बहिष्कारानंतर...

Post Office Scheme: ५ वर्षात १३ लाखांचा परतावा अन्...; पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ठरतेय फायद्याची!

Latest Marathi News Updates : श्रीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात राडा! वकिलास झाली मारहाण

New Born Baby Care Tips: नवजात बाळाला मालिश व धुरी देणं खरंच योग्य आहे का? वाचा बालरोगतज्ज्ञ काय सांगतात

ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..

SCROLL FOR NEXT