United Nations 
ग्लोबल

कोरोनाचं थैमान असताना आणखी एक संकट ओढावणार, UN ने दिला गंभीर इशारा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगातील 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे यावर्षी जवळजवळ 4.9 कोटी लोक अत्यंत गरीबीमध्ये ढकलले जाऊ शकतात. तसेच जागतिक सकल घरगुती उत्पादनाच्या(GDP) घसरणीचा परिणाम लाखो लहान मुलांच्या विकासावर पडेल, अशी भीती संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनिओ गुतारेस यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्व देशांनी जागतिक अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ पाऊलं उचलावीत असं म्हटलं आहे. देशांनी तात्काळ पाऊलं उचलली नाहीत तर संपूर्ण जग भीषण अन्न आणीबाणीतून जाऊ शकतो, असा इशाराही गुतारेस यांनी दिला आहे.

गुतारेस यांनी मंगळवारी अन्न सुरक्षेवर एक पत्रक जाहीर केले. यानुसार, जगाच्या 7.8 अब्ज लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न उपलब्ध आहे. मात्र, सद्य स्थितीत 82 करोडपेक्षा अधिक लोक भुकबळीचे शिकार आहेत. तसेच पाच वर्षांपेक्षा कमी वय असणारी 14.4 कोटी लहान मुले यांचाही विकास थांबला आहे. आपली अन्न व्यवस्था ढासाळत आहे आणि त्यात कोरोना महामारी उद्धवल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. याचा परिणाम करोडो लहान मुले आणि तरुणांवर होणार आहे.

कोरोना महामारीचे सकंट सर्व जगावर ओढावले आहे. यामुळे जगातील जवळजवळ 4.9 कोटी लोक अंत्यत गरिबीमध्ये ढकलले जाणार आहेत. अन्न आणि पोषण व्यवस्थित मिळत नसलेल्या लोकांची संख्या झपाट्याने लाढत आहे. कोरोना महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती अशीच सुरु राहिली तर लाखो लहान मुले विकासापासून वंचित राहतील. ज्या देशात पुरेसे अन्न उपलब्ध आहे, त्या देशांची अन्न श्रृंखला कोरोनामुळे बाधित झाली आहे, असं गुतेरेस म्हणाले आहेत. 

सध्या अनेक देश कोरोना महामारीला तोंड देण्यात गुंतले आहेत. मात्र, त्यांनी अन्न सुरक्षेकडेही तात्काळ लक्ष वेधावे, असं गुतारेस म्हणाले आहेत. कोरोना महामारीचा सर्वाधिक भयंकर परिणाम अन्न सुरक्षेवर पडू शकतो. देशांनी लोकांचा जीव वाचवण्यावर त्यांची उपजीविका वाचवण्यावरही भर द्यावा. ज्या ठिकाणी सर्वात जास्त जोखीम आहे त्याठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व देशांनी अन्न आणि पोषण सेवा अनिवार्य करायला हवी. तसेच अन्न क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरेसी सुरक्षा पुरवायला हवी, असंही गुतेरेस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT